Lokrakshanay
Monday, June 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

निवडणूक विशेष पोलीस निरीक्षकांनी घेतला कोकण विभागातील निवडणूक तयारीचा आढावा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 12, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
निवडणूक विशेष पोलीस निरीक्षकांनी घेतला कोकण विभागातील निवडणूक तयारीचा आढावा
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीची मतदान प्रक्रिया २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकण विभागातंर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांच्या तयारीचा आढावा मंगळवारी निवडणूक विशेष पोलीस निरीक्षक दीपक मिश्रा यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीदरम्यान घेतला. निवडणूकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असून या कर्तव्यात कोणतीही कसूर राहणार नाही. या दृष्टीने विधानसभा सार्वत्रिक निवडणूका शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातील जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस प्रशासन यांनी सतर्क राहण्याचे आदेश देत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या.

मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विशेष पोलीस निरीक्षक यांनी कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांतील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी पालघर, रायगड, रत्नागिरी, ‍सिंधुदूर्ग येथील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी हे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. सुरूवातीला ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी ठाणे जिल्हयातील १८ विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रे, मतदानाची तयारी याबाबत सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती दिली. तसेच कोकण ‍विभागातंर्गत इतर जिल्ह्याबाबतही त्यांनी जाणून घेतले.

‍प्रत्येक जिल्हयात तयार करण्यात आलेल्या कंट्रोल रुमच्या माध्यमातून मतदानाच्या एक दिवस आधी १९ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रियेची अभिरुप चाचणी घेण्यात यावी, जेणेकरुन मतदानाच्या दिवशी येणाऱ्या संभाव्य अडचणी टाळता येतील.‍ मतदान केंद्रावर मतदानासाठी येणारे उमेदवार हे मतदान झाल्यानंतर मतदान केंद्राच्या बाहेर १०० मीटर परिसरात रेंगाळणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी, असे श्री.मिश्रा यांनी नमूद केले.  मतदान केंद्रावर येणाऱ्या वयोवृद्ध मतदारांसाठी जास्तीत जास्त व्हीलचेअर उपलब्ध करण्यात याव्यात, जेणेकरुन मतदारांना मतदान केंद्रावर ताटकळत उभे रहावे लागणार नाही, यासाठी आपल्या विभागातील रुग्णालय, सेवाभावी संस्थांशी संपर्क साधून व्हीलचेअरची पुरेशी उपलब्धतता प्रत्येक मतदान केंद्रावर करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

एखाद्या मतदान केंद्रावर मशीनमध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण होवून मतदान प्रक्रिया थांबली किंवा अन्य काही अडचण उद्भवली तर त्याचे वृत्त हे दिवसभर विविध वाहिन्यांवर दाखवले जाते. त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाल्यावरसुध्दा ती बातमी तशीच सतत सुरू असते याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी ‍याबाबतची माहिती घेवून संबंधित वाहिन्यांशी संपर्क साधून वस्तूस्थिती तात्काळ कळविण्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, जेणेकरुन निवडणूक विभागाची बदनामी होणार नाही, या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही श्री.दीपक मिश्रा यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व ठिकाणी भरारी पथकाच्या माध्यमातून सुरू असलेली वाहनांची तपासणी देखील काटेकोरपणे करण्याचे निर्देश निवडणूक विशेष पोलीस‍ निरीक्षक दीपक मिश्रा यांनी पोलीस प्रशासनाला दिले. ‍कोकण विभागातील सर्व जिल्हयांची मतदानाची तयारी ही अंतिम टप्प्यात असून एखादी समस्या उद्भवल्यास तात्काळ निवडणूक आयोगाशी समन्वय साधावा असे नमूद करीत त्यांनी निवडणूका ‍नि:पक्षपातीपणे व निर्भयपणे पार पाडण्यासाठी सर्व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous Post

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या कार्तिक एकादशीनिमित्त महापूजेचा मान मिळाला वारकरी सगर दाम्पत्याला

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात विशेष निधीतून उभारलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य स्मारक आचारसंहितेच्या कचाट्यात

Next Post
मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात विशेष निधीतून उभारलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य स्मारक आचारसंहितेच्या कचाट्यात

मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात विशेष निधीतून उभारलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य स्मारक आचारसंहितेच्या कचाट्यात

BreakingNews

CID मध्ये मृतदेहाची भूमिका, दिवसाला मिळायचे एवढे रुपये; अर्चना गौतमने सांगितला संघर्षाचा प्रवास!

कार्यालयांचे फेरे टळले, परवानग्यांची प्रक्रिया आता ऑनलाईन! गणेश मंडळांना मोठा दिलासा

एफआयआर कॉपी न दिल्याने वाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला उच्च न्यायालयाचा दणका; २५ हजारांचा दंड!

ठाणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई; ३९ कोटींचे अंमली पदार्थ कायमचे नष्ट!

पुणे विभागातील कर्करोग रुग्णालयाच्या कामाला गती; अत्याधुनिक उपचारांसाठी शासन कटिबद्ध – सुनेत्रा अजित पवार

१ जुलैपासून पासपोर्ट महागणार; १४ वर्षांनंतर शुल्कात मोठी वाढ!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.