Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पुण्यात सीबीआयने फ्रॉड कॉल सेंटरवर छापे टाकत १० जणांना केली अटक !

लाखोंच्या साहित्यासह ३ आलीशान मोटारी जप्त

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 1, 2024
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
पुण्यात सीबीआयने फ्रॉड कॉल सेंटरवर छापे टाकत १० जणांना  केली अटक !
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच सीबीआयने राज्यात विविध ठिकाणी छापेमरी केली आहे. तब्बल ३६ ठिकाणी छापे घालण्यात आले असून पुण्यातील १० ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत बेकायदेशीर रित्या कॉल सेंटर चालवून सायबर फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पुण्यातून १० जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून लाखो रुपयांच्या साहित्यासह तीन आलीशान कार जप्त करण्यात आल्या आहेत.

राज्यात सीबीआयने सायबर चोरट्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. तब्बल ३६ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. राज्यसह देशात देखील अनेक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. नागरिकांना जाळ्यात अडकवून त्यांची ऑनलाइन पद्धतीने फसवणूक केली जात होती. त्यामुळे सायबर गुन्हेगारी नेटवर्क विरोधात सीबीआयची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

सीबीआयने केलेल्या या कारवाईत पुण्यातून १०, हैदराबादमधून ५ व विशाखापट्टणम येथून ११ अशा २६ जणांना देशभरातून या सायबर फ्रॉड प्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय संचालन विभागाने २४ सप्टेंबर रोजी ऑपरेशन चक्र-३ च्या माध्यमातून सायबर फसवणुकीबाबत खटला दाखल करत या प्रकरणी तपास करत असतांना गुरुवार सायंकाळपासून आजपर्यंत पुणे, हैदराबाद, अहमदाबाद व विशाखापट्टण येथील ३२ वेगवेगळ्या ठिकाणी छापे घालण्यात आले.

पुण्यातील रिजेंट प्लाझा या ठिकाणी सुरू असलेल्या कॉल सेंटरवर सीबीआयच्या पथकाने छापे टाकले. सायबर नेटवर्कच्या माध्यमातून कॉल सेंटरमधील काही कर्मचारी या गुन्हात असल्याची शक्यता आहे. आता पर्यंत या प्रकरणी विविध कॉल सेंटरमधून १७० जणांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. कारवाई करण्यात आलेल्या ठिकांनावरून मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच काही इलेक्ट्रॉनिक वस्तु देखील जप्त करण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत ५८ लाख रुपयांची रोकड व ३ आलीशान मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.

Previous Post

“किमान देवांना तरी राजकारणापासून दूर ठेवा”- सर्वोच्च न्यायालय

Next Post

आता विद्यार्थ्यांवर करडी नजर; CBSE च्या धरतीवर राज्य बोर्डाच्या परीक्षेत मोठा बदल

Next Post
आता विद्यार्थ्यांवर करडी नजर; CBSE च्या धरतीवर राज्य बोर्डाच्या परीक्षेत मोठा बदल

आता विद्यार्थ्यांवर करडी नजर; CBSE च्या धरतीवर राज्य बोर्डाच्या परीक्षेत मोठा बदल

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.