Lokrakshanay
Thursday, May 14, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

“किमान देवांना तरी राजकारणापासून दूर ठेवा”- सर्वोच्च न्यायालय

पुढील सुनावणी पर्यंत राज्य सरकारला जैसे थे स्थिती ठेवण्याचे न्यायालयाचे निर्देश

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 30, 2024
in ताज्या बातम्या, देश -विदेश
“किमान देवांना तरी राजकारणापासून दूर ठेवा”- सर्वोच्च न्यायालय
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली :  तिरुपती देवस्थानाच्या प्रसादासंदर्भात चालू असणारा वाद राजकीय मुद्दा होऊ लागला आहे. आधी विद्यमान मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीच आधीच्या सरकारच्या काळात प्रसादाच्या लाडूंसाठी भेसळयुक्त तूप वापरलं जात होतं असा खळबळजनक आरोप केला. त्यानंतर वायएसआरसीपी अर्थात आंध्र प्रदेशातील आधीच्या सत्ताधारी पक्षाकडून हे आरोप फेटाळण्यात आले. त्यावरून आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चालू झालं आहे. यासंदर्भात न्यायालयानं सुनावणीदरम्यान गंभीर भाष्य केलं. तसेच, पुढील सुनावणी तीन तारखेला ठेवली आहे.

न्यायमूर्ती बी. के. गवई व न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी चालू आहे. यावेळी न्यायालयाने “किमान देवांना तरी राजकारणापासून दूर ठेवा अशी अपेक्षा आम्ही करतो”, अशी टिप्पणी केली. “हा श्रद्धेचा विषय आहे. जर भेसळयुक्त तूप वापरलं गेलं असेल, तर ते अजिबात स्वीकारार्ह नाही”, असा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयासमोर केला. तुषार मेहता यांच्या युक्तिवादावर न्यायमूर्तींनी यासंदर्भातल्या पुराव्याची मागणी केली. “प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी भेसळयुक्त तूप वापरलं गेलं होतं, याचा काय पुरावा आहे?” अशी विचारणा यावेळी न्यायालयाने केली.

पुराव्यादाखल प्रयोगशाळेत झालेल्या तपासणीच्या अहवालाचा संदर्भ देण्यात आला आहे. मात्र, न्यायालयाने यासंदर्भात सविस्तर टिप्पणी केली आहे. “प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या तुपामध्ये भेसळ असल्याचा निष्कर्ष ज्या अहवालाच्या आधारे काढण्यात आला आहे, त्या अहवालावरून असं स्पष्ट होत आहे की अहवालासाठीचे नमुने गोळा करण्यात आलेला तुपाचा साठा प्रसाद बनवण्यासाठी वापरलाच गेलेला नाही”, असं न्यायालयाने यावेळी नमूद केलं.

दरम्यान, यावेळी न्यायालयाने माध्यमांमध्ये या मुद्द्यावरून चालू असणाऱ्या चर्चेवरून पक्षांना सुनावलं आहे. “जर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते, तर मग यासंदर्भात माध्यमांकडे जाण्याच काय आवश्यकता होती?” अशी विचारणा न्यायालयाने केली.

सर्वोच्च न्यायालयाने यावेळी केंद्र सरकारला चौकशी प्रक्रियेसंदर्भात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथक अर्थात एसआयटीनं आपला तपास पुढे चालू ठेवायचा आहे की नाही? याबाबत केंद्राला विचारणा करण्यात आली आहे. येत्या ३ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार असून तोपर्यंत राज्य सरकारला जैसे थे स्थिती ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

Previous Post

दापोली, गुहागर आणि राजापुर मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार निश्चित

Next Post

पुण्यात सीबीआयने फ्रॉड कॉल सेंटरवर छापे टाकत १० जणांना केली अटक !

Next Post
पुण्यात सीबीआयने फ्रॉड कॉल सेंटरवर छापे टाकत १० जणांना  केली अटक !

पुण्यात सीबीआयने फ्रॉड कॉल सेंटरवर छापे टाकत १० जणांना केली अटक !

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.