Lokrakshanay
Wednesday, April 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा आरोप; जितो संस्थेला कळवा रुग्णालयाऐवजी अधिक महत्त्व

महापालिका कळवा रुग्णालयाऐवजी जितो या संस्थेला अधिक महत्व देत आहे. जितो या संस्थेला अशाचपद्धतीने पोसणार असाल तर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊ असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 15, 2023
in ठाणे
मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा आरोप; जितो संस्थेला कळवा रुग्णालयाऐवजी अधिक महत्त्व
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मृत्यूचे तांडव होत आहे. असे असतानाही महापालिका कळवा रुग्णालयाऐवजी जितो या संस्थेला अधिक महत्व देत आहे. जितो या संस्थेला अशाचपद्धतीने पोसणार असाल तर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊ असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला. कळवा येथे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एकाच दिवशी १७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महापालिका रुग्णालयाच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महापालिकेवर गंभीर आरोप केले. कळवा रुग्णालयाची क्षमता वाढविण्याऐवजी केवळ दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. महापालिका जितो या संस्थेला अधिक महत्व देत आहे. साकेत येथे जितो संस्थेला देण्यात आलेल्या जागेवर कर्करोग रुग्णालय सुरु करण्याऐवजी त्याठिकाणी कळवा रुग्णालयाचे विस्तारीकरण केले जावे अशी मागणी त्यांनी केली आहे. जितोला पोसणार असाल तर त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

एखाद्या रुग्णाला बायपास करायची असेल तर जितोच्या हाजुरी येथील रुग्णालयात अडीच लाख रुपयांचा खर्च सांगितला जात आहे. मात्र, कळवा रुग्णालयात अवघ्या सात ते आठ हजारात उपचार होतात. महापालिकेने जितोवर मेहरबानी दाखविली आहे. कर्करोग रुग्णालयासाठी महापालिकेने जितोला इतरत्र जागा द्यावी. कळवा रुग्णालयात झालेल्या मृत्यूच्या तांडवानंतर याची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. परंतु चौकशी समिती अहवाल का आणि कोणासाठी लांबविला जात आहे. कोणावर कारवाई करायचीच नसेल तर चौकशी समितीची अट्टाहासच का केला असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला. माझ्याविरोधात आता विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होऊ शकतात. जितो संस्थेविरोधात बोलू लागल्याने गुन्हे दाखल होतील, असा गौप्यस्फोट जाधव यांनी केला आहे.

Previous Post

नगरविकास विभागाचे महापालिकांना आदेश; गणेशोत्सव मंडळांना आता पाच वर्षांसाठी परवानगी

Next Post

अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापिठाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Next Post
अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापिठाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापिठाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.