Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘पाकिस्तान’च्या उल्लेखावरून सरन्यायाधीशांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना दिली समज

न्यायमूर्ती श्रीशानंदन यांनी आपल्या टिप्पणीबाबत दिलगिरी व्यक्त केल्यामुळे याबाबत अधिक सविस्तर सुनावणी न करता सुनावणी बंद करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 25, 2024
in ताज्या बातम्या, देश -विदेश
‘पाकिस्तान’च्या उल्लेखावरून सरन्यायाधीशांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना दिली समज
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत असल्याचं दिसून आलं आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये त्यांनी बंगळुरूतील एका मुस्लीमबहुल भागाला ‘पाकिस्तान’ म्हटल्याचं दिसत आहे. या प्रकाराची थेट सर्वोच्च न्यायालयाने सू-मोटो दखल घेतली असून त्यावर आज सविस्तर सुनावणी झाली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यी खंडपीठाने या विधानावरून संबंधित न्यायाधीशांना परखड शब्दांत सुनावलं आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. श्रीशानंदन यांच्या कोर्टातील एका सुनावणीवेळचा हा व्हिडीओ आहे. न्यायमूर्ती व्ही. श्रीशानंदन बंगळुरूतील एका मुस्लीमबहुल भागाला ‘पाकिस्तान’ म्हणून संबोधत असल्याचं दिसत आहे. पश्चिम बंगळुरीमधील गोरी पाल्या या भागातील विम्याबाबतच्या एका प्रकरणाची सुनावणी चालू असताना हा प्रकार घडला. “तुम्ही म्हैसूर मार्गावर जाऊन बघा. प्रत्येक रिक्षात १० माणसे भरली जातात. म्हैसूर मार्ग भारतात नसून पाकिस्तानात आहे का? हेच आपल्या व्यवस्थेचं वास्तव आहे. तुम्ही त्याठिकाणी कितीही कडक पोलीस अधिकारी नेमा. ते फक्त तिथे मारझोड करण्याचे काम करतात”, असं विधान त्यांनी केलं होतं.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराची दखल घेऊन संबंधित न्यायमूर्तींना समज दिली. “भारतातील कोणत्याही भागाला तुम्ही ‘पाकिस्तान’ म्हणू शकत नाहीत. देशाच्या सार्वभौम एकात्मतेच्या तत्वाच्या हे विरोधात आहे”, अशी टिप्पणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केली. या खंडपीठात सरन्यायाधीशांसमवेत न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बी. आर. गवई, न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती ऋषीकेश रॉय यांचा समावेश होता.

दरम्यान, न्यायमूर्ती श्रीशानंदन यांनी आपल्या टिप्पणीबाबत दिलगिरी व्यक्त केल्यामुळे याबाबत अधिक सविस्तर सुनावणी न करता सुनावणी बंद करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला. मात्र, यावेळी न्यायाधीशांनी आजच्या सोशल मीडियाच्या काळात टिप्पणी करताना काळजी घेणं किती आवश्यक आहे, याबाबत न्यायालयाने मत व्यक्त केलं. “जेव्हा एखाद्या विशिष्ट समुदाय वा गटाच्या विरोधात सहज म्हणून केली जाणारी विधानं येतात, तेव्हा त्यातून वैयक्तिक दुजाभाव दिसून येतो. त्यामुळे आपल्या समाजातील कोणत्याही गटाबाबत न्यायालयांनी अशा प्रकारची विधानं न करण्याची काळजी घेतली पाहिजे”, असं मत यावेळी सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं.

Previous Post

45 व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच भारताने या स्पर्धेत सुवर्ण पदकाची केली कामगिरी

Next Post

आता संसदेचे कामकाज पाहण्यासाठी एकच डिजिटल व्यासपीठ ‘डिजिटल संसद’ !

Next Post
आता संसदेचे कामकाज पाहण्यासाठी एकच डिजिटल व्यासपीठ ‘डिजिटल संसद’ !

आता संसदेचे कामकाज पाहण्यासाठी एकच डिजिटल व्यासपीठ ‘डिजिटल संसद’ !

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.