Lokrakshanay
Sunday, May 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लालबागमध्ये गोंधळ: पोलिसांच्या मारहाणीत जनक्षोभ निर्माण झाला

गौरी-गणपती विसर्जन होतं. यावेळी खटाव बिल्डिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकी दरम्यान मोठा वाद झाला. डीजे सिस्टिम बंद करण्यावरुन या सर्व वादाला सुरुवात झाली. एका पोलिसाने डीजे ऑपरेट करणाऱ्या तरुणाला मारहाण केली. त्याचं सामान उचलून घेऊन गेले. त्यावरुन लालबागमधील खटाव बिल्डिंगचे रहिवाशी, नागरिक रस्त्यावर आंदोलनाला बसले

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 13, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
लालबागमध्ये गोंधळ: पोलिसांच्या मारहाणीत जनक्षोभ निर्माण झाला
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : लालबागमध्ये रात्री विसर्जन मिरवणुकी दरम्यान मोठा राडा झाला. काल गौरी-गणपती विसर्जन होतं. यावेळी खटाव बिल्डिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकी दरम्यान मोठा वाद झाला. डीजे सिस्टिम बंद करण्यावरुन या सर्व वादाला सुरुवात झाली. एका पोलिसाने डीजे ऑपरेट करणाऱ्या तरुणाला मारहाण केली. त्याचं सामान उचलून घेऊन गेले. त्यावरुन लालबागमधील खटाव बिल्डिंगचे रहिवाशी, नागरिक रस्त्यावर आंदोलनाला बसले. विसर्जन मिरवणूक पुढे नेणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली. वाद वाढल्यानंतर स्थानिक आमदार अजय चौधरी, खासदार अरविंद सावंत तिथे पोहोचले. त्यांनी मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न केला. “आम्ही पोलिसांना सहकार्य करत होतो. पोलिसांनी सांगितल्यानंतर आम्ही आमचा डीजे बंद केला. पण या दरम्यान दोन पोलिसवाल ट्रकमध्ये चढले. त्यांनी लाथ मारुन स्पीकर खाली पाडला. दुसऱ्या पोलिसाने डीजे ऑपरेटरला लाथा-बुक्क्यानी मारहाण केली” असं स्थानिक नागरिक अभय घाग यांनी सांगितलं. या प्रकारावरुन नागरिक प्रचंड संतापले. मारहाण करणारे पोलीस माफी मागत नाहीत तसेच घेऊन गेलेल्या वस्तू परत आणून देत नाहीत, तो पर्यंत जागेवरुन हलायच नाही अशी भूमिका घेत तिथेच ठिय्या मांडला. “इतकं ताणून धरण्याची गरज नव्हती. घड्याळाच्या काट्यावर दहा मिनिटं, एक मिनटं असं बघण्याची गरज नाही. तुम्ही त्यांची जी वस्तू घेऊन गेलायत, ती परत आणून द्या. वातावरण का बिघडवताय? तुम्ही ऐकत नसाल, तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत” असं स्थानिक खासदार अरविंद सावंत म्हणाले. खटाव बिल्डिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच हे 99 व वर्ष आहे. पुढच्यावर्षी मंडळाच शतक महोत्सवी वर्ष आहे. लालबागमधील हे लालबागचा राजा, मुंबईचा राजा यापेक्षा हे जुन मंडळ आहे. मंडळाने नेहमीच चांगले सामाजिक उपक्रम राबवले आहेत.

Previous Post

उल्हास आणि वैतरणा उपखोऱ्यातील पाणी मराठवाड्यातील गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी ६१ कोटींची मंजुरी

Next Post

दिवा-भंडार्ली क्लीन-अप: कचऱ्याच्या समस्या वैज्ञानिक उपायांनी हाताळणार!

Next Post
ठाणे महापालिकाने सुरु केली ”एक खिडकी” योजना – गणेशोत्सव मंडपांच्या परवानगीसाठी

दिवा-भंडार्ली क्लीन-अप: कचऱ्याच्या समस्या वैज्ञानिक उपायांनी हाताळणार!

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.