Lokrakshanay
Thursday, October 16, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

डोंबिवलीत बोगस कंपनी स्थापन करून गुंतवणूकदारांची १० कोटींची फसवणूक

ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे यासंदर्भात शबरीप्रसाद गोपालन आचार्य (५०, रा. तळेगाव, कालवारोड, गोरेगाव तर्फ, माणगाव, रायगड) या शेतकऱ्याने तक्रार केल्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात आचार्य यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 8, 2024
in गुन्हेगारी, ठाणे, ताज्या बातम्या
अज्ञाताकडून सेवानिवृत्त आरटीओ अधिकारी आणि गुंतवणूकदारांची ६१ लाखांची फसवणूक
Share on FacebookShare on Whatsapp

डोंबिवली : ठाणे, रायगड जिल्ह्यातील ५० हून अधिक गुंतवणूकदारांची डोंबिवलीतील फडके रोडवरील सिनर्जी इन्व्हेसमेंट ॲडव्हायझर एल. एल. पी. आणि तिच्या इतर सहयोगी गुंतवणूकदार कंपन्यांनी ५० हून अधिक गुंतवणूकदारांची गुंतवणुकीवर १८ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे १० कोटीची फसवणूक केली आहे. गुंतवणूकदार कंपन्यांचे संचालक फरार झाले आहेत. ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे यासंदर्भात शबरीप्रसाद गोपालन आचार्य (५०, रा. तळेगाव, कालवारोड, गोरेगाव तर्फ, माणगाव, रायगड) या शेतकऱ्याने तक्रार केल्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात आचार्य यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश आत्माराम भोईर, अनघा महेश भोईर, शार्दुल सुधाकर रानडे, निशील चंद्रकांत राणे, अक्षय महाडिक, शैलेश कानू गावडे आणि इतर संचालक, तसेच या संचालकांशी संबंधित सिनर्जी इन्व्हेसमेंट, फिडलिस कॅपिटल मार्केट, फिडलिस ॲड्व्हटायझर, फिनबस सोल्युशन्स, कॉन्टम मॅनेजमेंट, ऐश्वर्या सिंडीकेट क्रेडिट सोसायटी, सौहार्द क्रेडिट सोसायटी या वित्तीय संस्थांच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऑक्टोबर २०१६ ते एप्रिल २०२४ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी सांगितले, महेश आत्माराम भोईर आणि इतर संचालकांनी बोगस गुंतवणूक कंपन्या स्थापन केल्या. सिनर्जी इन्व्हेस्टमेंट या गुंतवणूक कंपनीचे कार्यालय डोंबिवली शहरातील फडके रस्त्यावरील कृष्णा या उच्चभ्रूंच्या सोसायटीत अनिल आय रुग्णालयाच्या वरील मजल्यावर सुरू केले. या कंपन्यांनी गुंतवणुकीवर १४ ते १८ टक्के परतावा देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखविले. या आकर्षक परताव्याला भुलून, या कंपन्यांचे चकाचक कार्पोरेट कार्यालय पाहून गुंतवणूकदार या कंपन्यांकडे आकृष्ट झाले. डोंबिवलीसह ठाणे, रायगड जिल्ह्यातील ५० हून अधिक गुंतवणूकदारांनी या गुंतवणूक कंपनीत लाखो रूपयांच्या रकमा गुंतवणूक केल्या. या गुंतवणूक योजनेत रायगड मधील माणगाव येथे राहणारे शेतकरी शबरीप्रसाद आचार्य यांनीही ५१ लाख ८० हजार रूपयांची गुंतवणूक केली. ठराविक महिन्यानंतर गुंतवणूकदार कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षक परतावा देणे गरजेचे होते. तो त्यांनी दिला नाही.

विविध कारणे सांगून आकर्षक परतावा देण्यास टाळाटाळ सुरू केली. आकर्षक परतावा मिळत नसल्याने काही गुंतवणूकदारांनी मूळ रक्कम परत करण्याची मागणी महेश भोईरसह इतर संचालक यांच्याकडे सुरू केली. ग्राहकांच्या संपर्काला संचालकांनी प्रतिसाद देण्यास टाळाटाळ, उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. नंतर त्यांनी आपले मोबाईल बंद करून ग्राहकांशी संपर्क तोडला. नऊ वर्ष गुंतवणूक करून त्याच्यावर परतावा नाहीच, मूळ रक्कम परत मिळत नसल्याने सिनर्जी इनव्हेस्टमेंट कंपनीसह त्यांच्या इतर गुंतवणूकदार कंपन्या आणि त्यांचे संचालक आपली फसवणूक करत आहेत. त्यांनी आपल्या रकमेचा स्वार्थासाठी वापर करून आपली फसवणूक केली याची खात्री पटल्यावर शबरीप्रसाद आणि इतर गुंतवणूकदारांनी ठाणे आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार केली. आर्थिक गुन्हे विभागाचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.

Previous Post

५ महिन्यांपासून आदिवासी जिल्ह्यातील आरोग्य विभागातील डॉक्टर वेतनाविना

Next Post

मुंबईत महापालिका आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घोषित

Next Post
कोट्यवधींचे प्रकल्प पण महापालिकेच्या महसूलात बदल नाही, उलट खर्च दोन लाख कोटी

मुंबईत महापालिका आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घोषित

BreakingNews

‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन

सिग्नलवर गजरे, वस्तू विकणाऱ्या मुलांसाठी ठाण्यात पहिली सिग्नल शाळा!

शेतकऱ्यांनी आंबा, काजू व केळी या फळपिकांचा विमा उतरवावा – विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले

पुणेकरांची दिवाळी धूमधडाक्यात! २४ तास खुली राहणार फटाक्यांची दुकानं

चित्रपटसृष्टीत शोककळा; प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता राजू तालिकोटे यांचे निधन

फुकट्या रेल्वेप्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाईसाठी भरारी पथके स्थापन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.