Lokrakshanay
Tuesday, June 23, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ३८ शाळा-मुख्याध्यापकांसह घेतली बैठक

कोपरखैरणे, घणसोली भागांत शाळा सुटण्याच्या वेळेस सर्वच शाळांच्या समोरील रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. त्यातून सुटका करण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला असून शाळा प्रशासनात जनजागृती केली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 7, 2024
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ३८ शाळा-मुख्याध्यापकांसह घेतली बैठक
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : कोपरखैरणे, घणसोली भागांत शाळा सुटण्याच्या वेळेस सर्वच शाळांच्या समोरील रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. त्यातून सुटका करण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला असून शाळा प्रशासनात जनजागृती केली आहे. शाळा सोडताना शाळेसमोरील रस्त्यांवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध उपाय सुचवले आहेत. लोकसंख्येची सर्वाधिक घनता असणारा कोपरखैरणे आणि घणसोली येथे शाळा सुटण्याच्या वेळेस बहुतांश शाळांच्या परिसरांत प्रचंड वाहतूक कोंडी होते. अनेक पालक चारचाकी-दुचाकींचा आणतात. त्याचबरोबर शाळेच्या बसदेखील शाळेसमोर विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत थांबतात. चिंचोळे रस्ते, त्यात दोन्ही बाजूला वाहने उभी केल्यामुळे शाळांच्या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी प्रत्येक शाळेसमोर वाहतूक पोलीसच तैनात करण्यात आले होते. मात्र शिक्षित असूनही दोनच मिनिटे म्हणत बेशिस्तपणे दुचाकी, कार अशी वाहने उभी करून ५ ते २० मिनिटे, कधीकधी अर्धा तास आपल्या पाल्यांची वाट पाहत पालक उभे असतात. यात महिला पालकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. वाहतूक पोलिसांनी कितीही समजावून सांगितले तरी दोनच मिनिटे म्हणत पालक उभे राहतात. ती परिस्थिती कायदा शिकवत दंड आकारण्याची नसते तर वाहतूक पटापट सुरळीत करण्याची असते, त्यामुळे वाहतूक पोलिसांची तारांबळ उडते, अशी माहिती एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने दिली.

कोपरखैरणे वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी पुढाकार घेत कोपरखैरणे येथील सेंट मेरी शाळेत कोपरखैरणे, घणसोली भागांतील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व इतर पदाधिकारी यांची बैठक घेतली. शाळा सुटताना व भरताना होणारी वाहतूक कोंडी यावर कसा मार्ग काढता येईल याविषयी चर्चा करून त्यानंतर शाळेच्या वाहतूक संदर्भातील अडचणींवर कसा मार्ग काढता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. सर्वांनी वाहतुकीचे नियम कसे पाळावेत याबाबत प्रबोधन केले. या वेळी ३८ शाळा-महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच स्कूल बस, स्कूल व्हॅन युनियनचे पदाधिकारी हेदेखील उपस्थित होते. पालकांनी कसे वाहन उभे बस कशा पद्धतीने उभ्या कराव्यात जेणेकरून अन्य वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, शालेय वर्ग टप्प्याटप्प्याने सोडावे, शाळा प्रशासनातर्फे काही स्वयंसेवकांची नेमणूक शाळेचे पालक आणि बस चालकांशी समन्वय साधत वाहतूक नियंत्रित करावी असे अनेक उपाय यावेळी सुचवण्यात आले, अशी माहिती भिंगारदिवे यांनी दिली.

Previous Post

अपंग प्रवाशांनी प्रवेशासाठी मदत मागितली: डब्यांमध्ये पायऱ्यांची मागणी

Next Post

अंगावर मोटार घालून दुचाकी तरुणाला केला जिवे मारण्याचा प्रयत्न

Next Post
मद्यधुंद चालकाने वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करून केली मारहाण

अंगावर मोटार घालून दुचाकी तरुणाला केला जिवे मारण्याचा प्रयत्न

BreakingNews

टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी उठली!

माहितीचा अधिकार नियम २०२६ विरोधात अण्णा हजारे मैदानात!

बेस्टचा संप मिटला, मुंबईत बस सेवा पुन्हा सुरू!

चहाविक्रेत्याच्या सतर्कतेमुळे बनावट नोटांचा भांडाफोड; पुण्यात दोघांना अटक!

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.