Lokrakshanay
Thursday, April 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

अज्ञाताकडून सेवानिवृत्त आरटीओ अधिकारी आणि गुंतवणूकदारांची ६१ लाखांची फसवणूक

फसवणूक केल्यानंतर हा भामटा आपले जयहिंद कॉलनीमधील गोपी मॉलमधील कार्यालय बंद करून पळाला आहे

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 31, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
अज्ञाताकडून सेवानिवृत्त आरटीओ अधिकारी आणि गुंतवणूकदारांची ६१ लाखांची फसवणूक
Share on FacebookShare on Whatsapp

डोंबिवली – मुंबई, ठाण्यासह डोंबिवली परिसरातील गुंतवणूकदारांना चार टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा अशोकनगरमध्ये राहत असलेल्या एका भामट्याने सेवानिवृत्त उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह इतर गुंतवणूकदारांची ६१ लाख ३६ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. फसवणुकीचा आकडा कोटीच्या घरात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फसवणूक केल्यानंतर हा भामटा आपले जयहिंद कॉलनीमधील गोपी मॉलमधील कार्यालय बंद करून पळाला आहे. त्याच्या घराला कुलूप असल्याने गुंतवणूकदार हवालदिल आहेत. सुदाम महादू गिते असे फसवणूक करणाऱ्या गुंतवणूक सल्लागाराचे नाव आहे. तो डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा भागातील अशोकनगर मधील सोनुकाटे इमारतीत राहतो. गिते एन्टरप्रायझेस नावाने त्याने जयहिंद कॉलनीतील गोपी सिनेमा माॅलमध्ये कार्यालय सुरू केले होते. रुपकुमार मारोतराव बेलसरे (६०) असे फसवणूक झालेल्या आरटीओ अधिकाऱ्याचे नाव आहे. ते मुंबईत कुर्ला भागात कुटुंबीयांसह राहतात. ते मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत आहेत.

आरटीओ अधिकारी रुपकुमार बेलसरे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, आपण स्वत २०२२ मध्ये परिवहन विभागातून सेवानिवृत्त झालो. २०११ मध्ये आपले एक सहकारी सुरेंद्र अन्नमवार निवृत्त झाले. ते ठाणे येथे राहतात. अन्नमवार यांनी गिते यांना सांगितले की डोंबिवलीत सुदाम महादू गिते हे गुंतवणूक सल्लागार आहेत. ते आपल्या गुंतवणुकीवर चार टक्के परतावा देतात. आपण स्वता ४९ लाख रूपयांची गुंतवणूक केली आहे. त्यावर आकर्षक परतावा मिळतो. ही गुंतवणूक योजना चांगली वाटल्याने बेलसरे यांनीही आपल्या निवृत्तीनंतर मिळालेली एकूण ४० लाखाची रक्कम गिंते यांच्या आयसीआयसीआय बँकेत धनाव्दारे सप्टेंबर २०२२ मध्ये जमा केली. ठरल्याप्रमाणे या रकमेवर गिते यांनी ४० हजार रूपयांचा परतावा बेलसरे यांच्या बँक खात्यात जमा केला. बेलसरे यांनी आणखी दहा लाख रूपये पत्नी वर्ष आणि स्वताच्या नावे गिते यांच्याकडे गुंतविले.

या रकमेवरील परताव्याची वेळ आली तेव्हा गिते यांनी आता शेअर मार्केट खाली गेले आहे. त्यामुळे परतावा देण्यात अडचणी आहेत. शेअर मार्केट वर गेले की तुमचा शिल्लक १० लाखाचा परतावा तुम्हाला योग्यवेळी देऊ असे सांगितले. पहिल्या परताव्यानंतर बेलसरे यांना दुसरा परतावा मिळाला नाही. याबाबत बेलसरे यांनी भामटा गिते याला विचारणा केल्यावर आयसीआयसीआय बँक आपणास चांगली सेवा देत नाही म्हणून आपल्या १५० गुंतवणूकदारांची बँक खाती आपण ॲक्सिस बँकेत वळती करत आहोत. त्यामुळे परतावा देण्यास विलंब होत आहे. अनेक महिने अशी टाळाटाळ सुरू होती. बेलसरे, अन्नमवार यांनी आयसीआयसीआय बँकेत चौकशी केली तेव्हा त्यांना गिते यांनी गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रूपये काढले असल्याचे समजले. एप्रिल २०२४ पासून गिते यांनी गुंतवणूकदारांना परतावा न देता गोपी माॅलमधील कार्यालय बंद आणि घराला कुलुप लावून पळ काढला आहे. दररोज अनेक गुंतवणूकदार गोपी माॅलमधील कार्यालयाकडे फेऱ्या मारत आहेत. आपली व अन्नमावर यांची ६१ लाखाची आर्थिक फसवणूक केल्याने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

Previous Post

घोडबंदर मार्गावर खड्ड्यांमुळे वाहन चालक हैराण

Next Post

सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून, बेरोजगारांची फसवणूक

Next Post
सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून, बेरोजगारांची फसवणूक

सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून, बेरोजगारांची फसवणूक

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.