Lokrakshanay
Tuesday, May 5, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

डोंबिवलीत बेकायदा चाळी पावसाच्या पुराच्या पाण्याच्या विळख्यात

या भागातील खारफुटी नष्ट करून उभारलेल्या सुमारे पाच हजाराहून अधिक बेकायदा चाळी महापुराच्या पाण्याच्या विळख्यात आहेत

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 26, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
डोंबिवलीत बेकायदा चाळी पावसाच्या पुराच्या पाण्याच्या विळख्यात
Share on FacebookShare on Whatsapp

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, गणेशनगर भागात गेल्या पंधरा वर्षाच्या कालावधीत उल्हास नदीचा खाडी किनाऱ्यावर मातीचे भराव टाकून, या भागातील खारफुटी नष्ट करून उभारलेल्या सुमारे पाच हजाराहून अधिक बेकायदा चाळी महापुराच्या पाण्याच्या विळख्यात आहेत. कमी किमतीत मिळालेले घर दरवर्षी पुराच्या पाण्यात जात असल्याने या भागातील फसवणूक झालेले घर खरेदीदार आता त्रस्त आहेत. डोंबिवली शहरातील सर्वात मोठा हरितपट्टा म्हणून पश्चिमेतील देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, गणेशनगर, मोठागाव, सातपूल, कोपर भाग म्हणून ओळखला जात होता. खारफुटीची घनदाट जंगले या भागात होती. विविध प्रकारची जैवविविधता येथे होती. विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी या भागात पाहण्यास मिळत होते. पर्यावरण अभ्यासक, निसर्ग छायाचित्रकार यांचा या भागात सतत राबता असायचा.

पालिका अधिकरी, पोलीस यांच्या संगनमताने भूमाफियांनी देवीचापाडा परिसरातील खारफुटीचे घनदाट जंगल नष्ट केले. खाडी किनारा भागात मातीचे २० फूट उंचीचे भराव करून या भागात बेकायदा चाळींची उभारणी केली. या चाळींमधील घरे तीन ते पाच लाखाला सामान्यांना विकली. या भागात मोठा नवमतदार निर्माण झाल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी या भागात पाणी, रस्ते, पथदिवे यांची उभारणी करून दिली आहे. या भागातील भूखंडावर एक धार्मिक स्थळ राजकीय आशीर्वादाने काही मंडळींनी उभारले आहे. पालिकेचा टिटवाळा ते डोंबिवली देवीचापाडा, मोठागाव ते कोपर, आयरे, काटई-हेदुटणे बाह्य वळण रस्ता या बेकायदा चाळींच्या भागातून जात आहे.

महापालिकेची उद्यान, बगिचे अशा अशा अनेक सुविधांची येथे आरक्षणे आहेत. सुमारे ४० एकरहून अधिक भौगोलिक क्षेत्र असलेला हा पट्टा आहे. कुंभारखाणपाडा भागात खाडी किनारी पोहच रस्ते नसताना, पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता शिवसावली नावाने दहा बेकायदा इमारतींचा गृहप्रकल्प कुंभारखाणपाडा भागात खाडी किनारी सुरू आहे. गणेशनगर, खंडोबा मंदिर परिसरात पालिकेच्या परवानग्या न घेता बेकायदा इमारती खाडी परिसरात उभारल्या जात आहेत. या टोलेजंंग इमारती उभ्या राहत असताना पालिका अधिकारी फक्त दिखाव्या पुरती कारवाई करून या बेकायदा बांधकामांना अभय देत आहेत, असे या बेकायदा बांधकामांच्या विरुध्द लढा देणारे निर्भय बनो संस्थेचे महेश निंबाळकर यांनी सांगितले. अशाच पाच हजाराहून अधिक चाळी आयरे, कोपर पूर्व भागात आहेत. पालिकेने या बेकायदा बांधकामांवर ऑक्टोबरनंतर कारवाई करून या भागातील पालिकेचे भूखंंड, सरकारी जमिनी ताब्यात घेण्याची मागणी जागरूक नागरिकांंकडून केली जात आहे.

पालिका अधिकाऱ्यांनी मात्र आम्ही नेहमीच या भागातील बेकायदा चाळींवर कारवाई केली. ही कारवाई करताना राजकीय मंडळी दबाव आणतात. वेळोवेळी कारवाईत अडथळा आला, असे स्पष्ट केले. देवीचापाडा, कुंभारखाणपाडा भागातील हरितपट्टा बेकायदा चाळी, इमारतींसाठी भूमाफियांनी नष्ट केला आहे. या भागात दरवर्षी महापुराचे पाणी घुसते. सामान्यांचे संसार रस्त्यावर येतात. अधिकाऱ्यांचे हे पाप आहे. – महेश निंबाळकर, संस्थापक, निर्भय बनो संस्था.

Previous Post

रस्त्यावरील खड्डेप्रकरणी कंत्राटदार आणि सल्लागाराविरोधात कडक कारवाई, ५० लाखांचा दंड

Next Post

कल्याण शिळफाटा रोड भागात खड्ड्यामुळे तरुणाचा मृत्यू

Next Post
कल्याण शिळफाटा रोड भागात खड्ड्यामुळे तरुणाचा मृत्यू

कल्याण शिळफाटा रोड भागात खड्ड्यामुळे तरुणाचा मृत्यू

BreakingNews

‘म्हातारीचा बूट’ झळकणार नव्या रूपात; दुरुस्तीसाठी महापालिकेचे ७.५ लाखांचे पाऊल!

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.