Lokrakshanay
Sunday, August 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

‘उंच माझा झोका’ मालिकेतली छोटी रमा पहा आता कशी दिसतेय

रमा म्हणजे तेजश्री वालावलकर हिला आता ओळखणं झालंय कठीण

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 7, 2023
in मनोरंजन
‘उंच माझा झोका’ मालिकेतली छोटी रमा पहा आता कशी दिसतेय
Share on FacebookShare on Whatsapp

Tejashree Walavalkar : छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या मालिका प्रसारीत होत असतात. या मालिकांपैकी काही मालिका प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करतात. या मालिका बंद झाल्या तरी रसिकांच्या मनात त्यांचं स्थान कायम करुन जातात. अशाच मालिकांपैकी एक मालिका म्हणजे उंच माझा झोका.काही वर्षांपूर्वी उंच माझा झोका ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि खूप लोकप्रिय झाली. या मालिकेतून रमाबाई रानडे यांचा जीवन प्रवास रेखाटण्यात आला होता. दरम्यान आता अनेक वर्षांनंतर या मालिकेच्या दिग्दर्शकांची आणि मालिकेतील काही कलाकारांची भेट झाली.

उंच माझा झोका या मालिकेचे दिग्दर्शन विरेन प्रधान यांनी केले होते. या मालिकेत नीना कुलकर्णी, शरद पोंक्षे, कविता लाड, ऋग्वेदी प्रधान, स्पृहा जोशी, विक्रम गायकवाड, शर्मिष्ठा राऊत हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या मालिकेत रमाबाई रानडे यांच्या बालपणीची भूमिका बालकलाकार तेजश्री वालावलकर हिने निभावली होती. तर रमाबाई रानडे यांच्या मोठेपणाची भूमिका स्पृहा जोशीने साकारली होती. या दोघींनाही प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते.

यातील बालकलाकार तेजश्री आता बरीच मोठी झाली आहे. तिला आता ओळखणंदेखील कठीण झालं आहे. मालिकेचे दिग्दर्शक विरेन प्रधान यांची नुकतीच तेजश्रीसोबत भेट झाली. यानिमित्त त्यांनी तिच्याबरोबरचा एक सेल्फी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला.

विरेन प्रधान यांनी तेजश्रीसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, उंच माझा झोका. छोटी रमा आता मोठी झाली. दिवस भरभर मोठे होतात. आता विरेन प्रधान यांच्या या पोस्टवर त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

त्यांच्या पोस्टवर काही चाहत्यांनी कमेंट करत म्हटले की ही किती वेगळी दिसते!. ही कितीही बदलली तरीही अजून तशीच क्युट आहे.अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Previous Post

पंतप्रधानांच्या हस्ते ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ; महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश

Next Post

स्तनदा मातांनी स्तनपान करताना काही गोष्टी समजून घ्यायलाच हव्यात

Next Post
स्तनदा मातांनी स्तनपान करताना काही गोष्टी समजून घ्यायलाच हव्यात

स्तनदा मातांनी स्तनपान करताना काही गोष्टी समजून घ्यायलाच हव्यात

BreakingNews

शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात प्रशासनाची कडक पावले; ७० जणांवर कारवाई!

गुटख्याचे पाऊच होणार इतिहासजमा; आता छोट्या डब्यातच मिळणार पान मसाला – केंद्र सरकारचा निर्णय

डी-मार्टमधून १४,९४९ रुपयांचे किराणा सामान चोरण्याचा प्रयत्न; ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल

१ सप्टेंबरपासून एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य!

२०२९ पर्यंत सगळ्या लोकल मेट्रोसारख्या वातानुकूलित होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

खतांसाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही; ठाण्यात १५ ऑगस्टपासून ‘ऑनलाइन बुकिंग’ सुविधा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.