Lokrakshanay
Wednesday, June 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

साडेपाच कोटी रुपयांची पनवेलमधील महिलेची ऑनलाईन फसवणूक

पनवेल शहरातील एका सेवानिवृत्त ६४ वर्षीय महिलेची ऑनलाईन पद्धतीने अपसंपदेचा धाक दाखवून फोनवरुन तब्बल साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 8, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या
कामावरून काढून टाकल्याचा राग, कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला; चौघा हल्लेखोरांपैकी एकाला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

पनवेल : पनवेल शहरातील एका सेवानिवृत्त ६४ वर्षीय महिलेची ऑनलाईन पद्धतीने अपसंपदेचा धाक दाखवून फोनवरुन तब्बल साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. मागील महिन्यात ही घटना घडली असून दोन दिवसात या महिलेला पोलिसांची कारवाई होईल अशी भिती फोनवरुन दाखवून या महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संबंधित महिला या खासगी कंपनीत मानव संसाधन विभागात महिला काम करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितिन ठाकरे यांनी दिली. या महिलेने सेवानिवृत्त झाल्यावर आयुष्यभर जमविलेल्या बँकेतील रकमेवर भामट्यांनी ऑनलाईन पद्धतीने डल्ला मारला. ८ मे रोजी पळस्पे फाटा येथील साईवर्ल्डसीटी या संकुलामध्ये राहणाऱ्या ६४ वर्षीय महिलेला फोनवरुन सकाळी साडेनऊ वाजता संपर्क साधून फोनवरील व्यक्तीने त्याची ओळख सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच दुसऱ्या व्यक्तीने तो मुंबई येथील टेलीकॉम रेग्युलेटरी प्राधिकरणाचा नोटरी अधिकारी असल्याची ओळख सांगितली. या दोनही भामट्यांनी ६४ वर्षीय महिलेला ‘तुमच्या मोबाईलवरुन इतरांना फोन करुन मानसिक त्रास दिला जात असून त्याच्या तक्रारी सीबीआयकडे नोंदविल्याचे’ सांगण्यात आले. त्यामुळे या महिलेच्या अपसंपदेची तक्रार सीबीआयकडे केल्याने १० वर्षाचा तुरुंगवास भोगण्याची भीती दाखविण्यात आली. सीबीआयने कारवाई करु नये यासाठी पिडीत सेवानिवृत्त महिलेकडून ५ कोटी ६१ लाख १ हजार रुपये विविध बँक खात्यात वळते करण्यास भाग पाडले. याबाबत या पिडीत महिलेने सर्वत्र खात्री केल्यानंतर त्यांना हा सर्व बनाव असल्याचे उघड झाले. शुक्रवारी याबाबत पिडीत महिलेने पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. नवी मुंबई पोलीस दलाचे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग या प्रकरणी ऑनलाईन भामट्यांचा शोध घेत आहेत. या फसवणूकीमध्ये चोरट्यांनी मुंबई पोलीस १११ या नावाच्या युआरएलचा वापर केला तसेच स्काईप पत्यावर सीआयडी असा उल्लेख असल्याने पिडीत महिलेला काही वेळेसाठी हे सर्व खरे असल्याचे वाटल्याने ही फसवणूक झाली.

Previous Post

वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह ‘आयएमए’ची देखील मागणी; ‘नीट’ निकालाची सीबीआय चौकशी करा

Next Post

राष्ट्रपती पोलीस पदकांनी नवी मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस अधिकारी सन्मानित

Next Post
राष्ट्रपती पोलीस पदकांनी नवी मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस अधिकारी सन्मानित

राष्ट्रपती पोलीस पदकांनी नवी मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस अधिकारी सन्मानित

BreakingNews

टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी उठली!

माहितीचा अधिकार नियम २०२६ विरोधात अण्णा हजारे मैदानात!

बेस्टचा संप मिटला, मुंबईत बस सेवा पुन्हा सुरू!

चहाविक्रेत्याच्या सतर्कतेमुळे बनावट नोटांचा भांडाफोड; पुण्यात दोघांना अटक!

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.