Lokrakshanay
Tuesday, June 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह ‘आयएमए’ची देखील मागणी; ‘नीट’ निकालाची सीबीआय चौकशी करा

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी मुश्रीफ यांची भेट घेऊन नीट-यूजीत देण्यात आलेले ग्रेस मार्क रद्द करून सुधारित निकाल लागेपर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशी मागणी केली.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 8, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन दिवस राखीव – मंत्री हसन मुश्रीफ
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : नीट – यूजी परीक्षा आणि निकालाशी संबंधित सर्व माहितीचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी व त्याची सीबीआयकडून चौकशी करण्याकरिता पंतप्रधान कार्यालयाला आणि नॅशनल मेडिकल कमिशनला (एनएमसी) पत्र लिहिणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) देखील सीबीआय चौकशीची मागणी करुन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय प्रवेश प्रक्रिया सुरू करू नये, अशी मागणी नॅशनल मेडिकल कमिशनकडे (एनएमसी) केली आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी मुश्रीफ यांची भेट घेऊन नीट-यूजीत देण्यात आलेले ग्रेस मार्क रद्द करून सुधारित निकाल लागेपर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशी मागणी केली. त्यावर विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले. नीट – यूजीच्या माहितीपत्रकात कुठेही वेळ कमी पडल्याने ग्रेस मार्क देण्याचा मुद्दा समाविष्ट नव्हता. तरीही दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिल्याने ऑल इंडिया रँकिंगमध्ये कमालीची वाढ झाली आहे. ओएमआर शीट आणि गुण स्कोअर कार्डशी जुळत नसल्याची पालकांची तक्रार आहे. राज्यातील अनेक विद्यार्थी बाहेरील संस्थांमध्ये प्रवेश घेऊ शकणार नाहीत. ऑल इंडिया कोट्यातील जागा त्यांना मिळणार नाहीत. अशाने सरकारी तर सोडाच राज्यातील खासगी कॉलेजातही प्रवेश मिळणार नाही. एनटीएने ग्रेस मार्कांच्या नावाखाली १०० ते १५० गुणांची खिरापत काही विद्यार्थ्यांना वाटली आहे. त्यामुळे कटऑफ वाढला असून, राज्यातील सरकारी कॉलेजात सोडाच खासगी मेडिकल कॉलेजलाही प्रवेश मिळणे कठीण होणार आहे.

Previous Post

पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे आशियातील पहिल्या महिला रेल्वेचालकांना आमंत्रण

Next Post

साडेपाच कोटी रुपयांची पनवेलमधील महिलेची ऑनलाईन फसवणूक

Next Post
कामावरून काढून टाकल्याचा राग, कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला; चौघा हल्लेखोरांपैकी एकाला अटक

साडेपाच कोटी रुपयांची पनवेलमधील महिलेची ऑनलाईन फसवणूक

BreakingNews

‘देऊळ बंद २’चा नफा शेतकरी मुलांच्या शिक्षणासाठी; प्रवीण तरडेंचा ऐतिहासिक निर्णय!

मुंबईत मराठी नामफलक मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण; १,१२४ आस्थापनांवर दंडात्मक कारवाई!

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.