Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

आमदार राजू पाटील यांची ‘एमएमआरडीए’वर टीका; शिळफाटा रस्त्यावरील मेट्रोची दिखाव्याची कामे बंद करा

मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी महायुतीचा धर्म बाजुला ठेऊन लोकांच्या समस्येची बाजू घेऊन ट्विटरच्या (एक्स) माध्यमातून पुन्हा शासनावर टीका करण्यास सुरूवात केली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 1, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
आमदार राजू पाटील यांची ‘एमएमआरडीए’वर टीका; शिळफाटा रस्त्यावरील मेट्रोची दिखाव्याची कामे बंद करा
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : शिवसेना-भाजपवर विकास कामांच्या माध्यमातून नेहमीच टिकेची झोड उठविणारे मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी महायुतीचा धर्म बाजुला ठेऊन लोकांच्या समस्येची बाजू घेऊन ट्विटरच्या (एक्स) माध्यमातून पुन्हा शासनावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना-भाजप युतीत सहभागी व्हायचे असल्याने मागील तीन महिन्यांपासून गप्प असलेल्या आमदार पाटील यांनी लोकसभा निवडणुका पार पडताच, पुन्हा राज्य सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडण्यास सुरुवात केली आहे. अनेक वर्षाचे कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे दुखणे या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणामुळे दूर झाले आहे. गेल्या दोन वर्षापासून या रस्त्यावरून समाधानाने सुसाट प्रवास करत आहेत. हा समाधानाचा श्वास घेत असताना आता कल्याण-शिळफाटा या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर कल्याण-तळोजा मेट्रोचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम करताना मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने शिळफाटा रस्त्याचे नवेकोरे काँक्रीट रस्ते, दुभाजक फोडून तेथे अतिभव्य अवजड यंत्रणा खोदकामासाठी आणून ठेवली आहे. त्यामुळे या यंत्रणेमुळे आत्ताच सोनारपाडा, गोळवली भागात वाहन कोंडीला सुरूवात झाली आहे, अशी माहिती आमदार पाटील यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून दिली आहे.

कल्याण-तळोजा मेट्रो रस्ते कामासाठी भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्यामुळे ज्याठिकाणी मोकळा भूभाग आहे. जेथे वाहन कोंडी होणार नाही अशा ठिकाणी पहिले मेट्रोचे खड्डे आणि इतर कामे सुरू करावीत. जेणेकरून लोकांना त्रास आणि कोंडीत लोकांना अडकावे लागणार नाही. याचा कोणताही विचार न करता शिळफाटा रस्त्यावर डोंबिवलीकरांना दिसेल अशा सोनारपाडा, गोळवली या वर्दळीच्या ठिकाणी अवजड यंत्रणेतून शिळफाटा रस्त्यावर खड्डे मारण्याची कामे एमएमआरडीएने सुरू केली आहेत. मेट्रो आली, काम सुरू झाले. जगाला दिसले आणि याच काळात लोकसभा निवडणुका पण पार पडल्या. हा शोभेचा देखावा मनासारखा पार पडला आहे ना, मग आता शांत बसून उर्वरित भागात मेट्रोचे काम सुरू करा, असा कचकचीत टोमणा आमदार राजू पाटील यांनी कल्याण परिसराचे विश्वकर्माच आपण या अविर्भावात वावरणाऱ्या एका शायनर लोकप्रतिनिधीला अनुल्लेखून लगावला आहे. या विषयाची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे.

Previous Post

सिडकोचे आपत्कालिन कक्ष आपत्तीवर मात करण्यासाठी सज्ज

Next Post

एअरपोर्टचा बनावट एन्ट्री पास बनवत घुसखोरीचा प्रयत्न; सहार पोलिसांकडून २२ वर्षीय तरुणाला अटक

Next Post
१.६० कोटीचे ३ किलो सोने मुंबई विमानतळावर जप्त

एअरपोर्टचा बनावट एन्ट्री पास बनवत घुसखोरीचा प्रयत्न; सहार पोलिसांकडून २२ वर्षीय तरुणाला अटक

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.