Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

ग्रामसेविकेला अश्लील शिवीगाळ, धमकावणी प्रकरणी ग्रामसेवक संघटनेचा काळ्याफीती लाऊन निषेध

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 18, 2024
in ताज्या बातम्या, नवी मुंबई, महाराष्ट्र
ग्रामसेविकेला अश्लील शिवीगाळ, धमकावणी प्रकरणी ग्रामसेवक संघटनेचा काळ्याफीती लाऊन निषेध
Share on FacebookShare on Whatsapp

उरण प्रतिनिधी : महिला ग्रामसेविकेला अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकावल्या प्रकरणी शुक्रवारी (१७) उरण ग्रामसेवक संघटनेच्या वतीने उरण पंचायत समितीच्या कार्यालयासमोरच काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी निषेध कार्यक्रमात सहभागी झालेल्या ग्रामसेवकांनी विस्तार अधिकाऱ्यांशी भेट घेऊन अशा वाढत्या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी उपाययोजना व संबंधितांवर कारवाई करण्याचीही मागणी केली.
हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सुप्रिया घरत यांची उरण पंचायत कार्यालयात काही प्रकरणांमध्ये सुनावणी सुरू होती. सुनावणी दरम्यान त्याठिकाणी हनुमान कोळीवाडा गावातील रहिवासी रविंद्र कोळी हे आले होते. रविंद्र कोळी यांनी ग्रामसेविका सुप्रिया घरत यांच्याशी विनाकारण वाद घातला. या वादातच त्यांनी ग्रामसेविका सुप्रिया घरत यांना सर्वांसमक्षच अश्लील भाषेत शिवीगाळ करुन धमकावले. याप्रकरणी ग्रामसेविका सुप्रिया घरत यांनी ग्रामसेवक संघटनेच्या माध्यमातून उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीनंतर उरण पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये कामकाज करताना ग्रामसेवकांना नागरिकांकडून शिवीगाळ, मारहाण करण्याच्या धमक्या देण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. यामुळे काम करताना ग्रामसेवकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.
नागरिकांकडून अशा प्रकारे होणाऱ्या घटनांपासून सरंक्षण व्हावे व त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (१७);दुपारी उरण पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उरण ग्रामसेवक संघटनेच्या वतीने ग्रामसेवकांनी काळ्याफीती लाऊन निषेध व्यक्त केला.त्यानंतर त्यांनी विस्तार अधिकारी विनोद मिंडे यांची भेट घेऊन कामकाज करताना ग्रामसेवकांना सुरक्षिततेसाठी उपाययोजना आणि अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

Previous Post

बेकायदा फलकांचे तोडकाम पनवेल महापालिका प्रशासन दोन दिवसांत हाती घेणार  

Next Post

भाजपला पुन्हा संधी मिळाल्यास सर्वांचा मतदानाचा अधिकार संकटात – शरद पवार

Next Post
भाजपला पुन्हा संधी मिळाल्यास सर्वांचा मतदानाचा अधिकार संकटात – शरद पवार

भाजपला पुन्हा संधी मिळाल्यास सर्वांचा मतदानाचा अधिकार संकटात – शरद पवार

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.