Lokrakshanay
Wednesday, June 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

नवघर पोलिसांकडून टोळीतील तिघांना अटक; दिडशे तरुणांची परदेशात नोकरीच्या आमिषाने केली फसवणूक

शेकडो तरुणांना परदेशात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणार्‍या टोळीतील ३ आरोपींना नवघर पोलिसांनी अटक केली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 4, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या
नवघर पोलिसांकडून टोळीतील तिघांना अटक; दिडशे तरुणांची परदेशात नोकरीच्या आमिषाने केली फसवणूक
Share on FacebookShare on Whatsapp

भाईंदर : शेकडो तरुणांना परदेशात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणार्‍या टोळीतील ३ आरोपींना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून ६ लाख रुपयांचा मुद्देमाल तसेच १४९ पारपत्र जप्त करण्यात आले आहेत. भाईंदर पूर्व येथील ईगल प्लेसमेंट सर्व्हिसेस कार्यालयाकडून ऑनलाईन तरुणांना परदेशात नोकरी देण्याचे प्रलोभन दाखविण्यात आले होते. यात प्रत्येकाकडून कंपनीने काम करण्यासाठी ७० हजार रुपये घेतले होते. या सर्वांना विमानाची तिकिटे व व्हीजाही देण्यात आले होते. मात्र त्यांचे पासपोर्ट घेऊन कंपनी मालक फरार झाले. याबाबत काही तरुणांनी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. दिडशेहून अधिक तरुणांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले.

नवघर पोलिसांनी या प्रकरणी तपास करून अबरार अहमद मुक्तार शाह, वसीम शाह आणि मोहम्मद सिद्धीकी यांना अटक केली. या टोळीतील अजून तीन आरोपी फरार आहेत. आरोपींकडून ६ लाखांचा मुद्देमाला आणि १४९ पारपत्र जप्त केल्याची माहिती उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे. या टोळीने कुणालाही परदेशात पाठवलेले नव्हते. भाईंदर प्रमाणेच मुंबई, दिल्ली आणि कोलकत्ता राज्यात अशा प्रकारचे कार्यालय थाटून तरुणांची फसवणूक करण्याची त्यांची योजना होती. नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी, पोलीस निरीक्षक अशोक कांबळे (गुन्हे) सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पालवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल धायगुडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे आदींच्या पथकाने कारवाई करून या टोळीला अटक केली.

Previous Post

शनिवारपासून गणेशोत्सव कालावधीतील रेल्वे आरक्षण सुरू होणार

Next Post

पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार; हजारो विद्यार्थ्यांचा फी न भरल्याने निकाल रखडला

Next Post
पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार; हजारो विद्यार्थ्यांचा फी न भरल्याने निकाल रखडला

पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार; हजारो विद्यार्थ्यांचा फी न भरल्याने निकाल रखडला

BreakingNews

टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी उठली!

माहितीचा अधिकार नियम २०२६ विरोधात अण्णा हजारे मैदानात!

बेस्टचा संप मिटला, मुंबईत बस सेवा पुन्हा सुरू!

चहाविक्रेत्याच्या सतर्कतेमुळे बनावट नोटांचा भांडाफोड; पुण्यात दोघांना अटक!

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.