Lokrakshanay
Monday, May 25, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

शनिवारपासून गणेशोत्सव कालावधीतील रेल्वे आरक्षण सुरू होणार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 3, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
होळी विशेष मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेच्या रेल्वेगाड्या
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई महानगरात राहणाऱ्या कोकणवासियांना आता गणेशोत्सवाची चाहूल लागली असून गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण शनिवारपासून (४ मे) सुरू होणार आहे. कोकणवासियांसाठी होळी आणि गणेशोत्सव हे अत्यंत जिव्हाळ्याचे सण आहेत. त्या कालावधीत मुंबईस्थित कोकणवासीय मूळ गावी धाव घेतात. वेगवेगळ्या मार्गाने गावी पोहचण्यासाठी धडपड सुरू असते. यंदाच्यावर्षी ७ सप्टेंबरला गणेशचतुर्थी आहे. त्यामुळे आता अनेक कोकणवासीयांचे गावी जाण्याचे नियोजन सुरू झाले आहे. भारतीय रेल्वेवरील नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण प्रवासाच्या १२० दिवसाआधी सुरु होते. त्यामुळे १ सप्टेंबर रोजी धावणाऱ्या कोकणातील रेल्वेगाडीचे तिकीट ४ मेपासून काढता येणार आहे. गेल्यावर्षी तिकीट आरक्षण सुरू झाल्यानंतर अवघ्या दीड मिनिटांत प्रतीक्षा यादी हजारांपेक्षा अधिक होती. तसेच तुतारी, जनशताब्दी, मांडवी या गाड्यांची तिकिटे काढताना, प्रतीक्षा यादीचीही क्षमता संपली होती.

मुंबईतून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मार्गावर जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण ७ मे रोजीपासून सुरू होणार आहे. ६ सप्टेंबर रोजी हरतालिका आहे. त्या दिवशीचे तिकीट आरक्षण ९ मेपासून सुरू होईल. गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर रोजी, ऋषिपंचमी ८ सप्टेंबर रोजी, गौरी विसर्जन १२ सप्टेंबर रोजी आणि १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशीचे रेल्वेगाड्यांचे तिकीट अनुक्रमे १० मे, ११ मे, १५ मे आणि २० मे रोजी काढता येणार आहे. प्रवाशांनी वेळापत्रक पाहून आरक्षण करावे. तिकीट आरक्षण रेल्वे स्थानक किंवा आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून किंवा अॅपवरून करू शकतात, असे आवाहन कोकण विकास समिती यांच्याकडून केले आहे.

 

Previous Post

कोथरूडमधील ढाब्यावर बेकायदा मद्य विक्री करणाऱ्या ढाबाचालकासह चौघांना अटक; एक लाखांचा दंड

Next Post

नवघर पोलिसांकडून टोळीतील तिघांना अटक; दिडशे तरुणांची परदेशात नोकरीच्या आमिषाने केली फसवणूक

Next Post
नवघर पोलिसांकडून टोळीतील तिघांना अटक; दिडशे तरुणांची परदेशात नोकरीच्या आमिषाने केली फसवणूक

नवघर पोलिसांकडून टोळीतील तिघांना अटक; दिडशे तरुणांची परदेशात नोकरीच्या आमिषाने केली फसवणूक

BreakingNews

पुण्याचे बुधवार पेठ बनले ‘मिनी बांगलादेश’! ११ महिन्यांत १०३ बांगलादेशी ताब्यात

खारेगाव टोलनाक्याजवळ ‘एडिबल ऑईल’च्या नावाखाली डिझेल तस्करी उघड; ४६.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

डिझेलसाठी शेतकऱ्यांकडे ७/१२ मागितल्यास पेट्रोल पंपांवर कारवाई

LPG गॅस २५ दिवसांपूर्वी संपला? जाणून घ्या ग्राहकांसाठी उपलब्ध ३ महत्त्वाचे पर्याय

पालघरमध्ये ४,१५० कोटींचे अत्याधुनिक मेरीटाईम कॉम्प्लेक्स; महाराष्ट्राला मिळणार जागतिक सागरी हबची ओळख

गावदेवी भाजी मंडई दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना मिळणार १० लाखांची मदत

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.