Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

२१ लाखांची गुंतवणुकीतून भरघोस परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक

समाज माध्यमातून कमी वेळात जास्त परतावा अशी जाहिरात करून त्याला बळी पडलेल्या गुंतवणूकदाराची २१ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 6, 2024
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
४३ हजार रुपयांची एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याची फसवणूक, बीकेसी पोलिसांकडून तपास सुरू
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : समाज माध्यमातून कमी वेळात जास्त परतावा अशी जाहिरात करून त्याला बळी पडलेल्या गुंतवणूकदाराची २१ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. उदय रत्नपारखी असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते एका खाजगी कंपनीत काम करत असून गुंतवणुकीवर भरघोस परतावा ते हि कमी वेळेत अशी जाहिरात त्यांच्या वाचनात आली. उदय यांनी त्या लिंकवर क्लिक करताच त्यांचा समावेश एका व्हाटस अप समूहात करण्यात आला. त्यांना संबंधित व्यक्तीने फोन करून कागदपत्रे मागवली त्यानुसार कागदपत्रे ऑन लाईन देताच एका ऍप द्वारे ऑन लाईन खाते उघडण्यात आले. आणि खाते क्रमांक म्हणून एक  मोबाईल क्रमांक देण्यात आला. उदय यांनी काही पैसे भरले व त्यांना परतावा हि चांगला मिळाला. म्हणून त्यांनी थोडे थोडे करीत १ मार्च ते १ एप्रिल दरम्यान तब्बल २१ लाख ६५ हजार १२७रुपये ऑन लाईन गुंतवले. हे पैसे त्यांनी विविध बँकेत देण्यास सांगण्यात आले होते. त्यांना विविध सहा कामपणीचे भाग (शेगर्स) विकत घेण्यात आले असे सांगण्यात आले.

किती रक्कम भरली आणि गुंतवणूकी वर किती परतावा मिळाला हे कळण्यासाठी जो ऍप डाऊन लोड केला होता त्यानुसार उदय यांच्या नावावर ४४ लाख ८१ हजार ६३५ रक्कम जमा असल्याचे दिसत होते. मात्र हि रक्कम उदय यांच्या बँक खात्यात वळती होत नव्हती. ही रक्कम त्यांनी वेळोवेळी मागितली मात्र परतावा जेवढा जमा झाला त्याच्या केवळ २० टक्के रक्कम मिळेल असे सांगून त्यांच्या बँक खात्यात ५ लाख ५४ हजार १२७ रुपये पाठवले. मात्र आता रक्कम हवी असेल तर ६ लाख ७२ हजार २२४ रुपये कर अगोदर भरावा लागेल असे त्या अनोखळी व्यक्तीने सांगितले. मात्र आपली फसवणूक होत आहे हे लक्षात आल्याने उदय यांनी याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Previous Post

गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ईसीजी तंत्रज्ञांअभावी रुग्णांचे हाल

Next Post

एक्स्प्रेसची साखळी खेचणाऱ्या महिलेवर गुन्हा; कल्याण स्थानकांतील प्रकार

Next Post
एक्स्प्रेसची साखळी खेचणाऱ्या महिलेवर गुन्हा; कल्याण स्थानकांतील प्रकार

एक्स्प्रेसची साखळी खेचणाऱ्या महिलेवर गुन्हा; कल्याण स्थानकांतील प्रकार

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.