Lokrakshanay
Thursday, June 25, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ईसीजी तंत्रज्ञांअभावी रुग्णांचे हाल

पूर्व उपनगरातील गोवंडी परिसरातील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात गेल्या पाच - सहा महिन्यांपासून ईसीजी तंत्रज्ञाची जागा रिक्त आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 5, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ईसीजी तंत्रज्ञांअभावी रुग्णांचे हाल
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : पूर्व उपनगरातील गोवंडी परिसरातील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात गेल्या पाच – सहा महिन्यांपासून ईसीजी तंत्रज्ञाची जागा रिक्त आहे. परिणामी, शताब्दी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना ईसीजी काढण्यासाठी खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. सध्या शताब्दी रुग्णालयातील अन्य विभागातील खासगी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने केवळ अत्यवस्थ रुग्णांचेच ईसीजी काढण्यात येत आहेत. शताब्दी रुग्णालयात दररोज गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द, चेंबूर, आणि देवनार परिसरातील ५०० ते ६०० रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी येत असतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, औषधांचा तुटवडा आशा अनेक समस्या रुग्णांना भेडसावत आहेत. त्यातच गेल्या पाच – सहा महिन्यांपासून ईसीजी तंत्रज्ञाची जागा रिक्त आहे. परिणामी, शताब्दी रुग्णालयात तंत्रज्ञाअभावी ईसीजी काढण्याची सुविधा नसल्याने रुग्णांना अन्य रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे.

शताब्दी रुग्णालय शीव-पनवेल महामार्ग, घाटकोपर-मानखुर्द जोडरस्ता आणि पूर्व मुक्त मार्गाला लागून आहे. परिणामी एखादा अपघात झाल्यास पहिल्यांदा जखमींना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात येते. त्यानंतर त्यांना शीव अथवा केईएम रुग्णालयात पाठवण्यात येते. मात्र येथे ईसीजी तंत्रज्ञच नसल्याने रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत रुग्णांनी अनेक तक्रारी केल्यानंतर काही दिवसांपासून येथील इतर विभागांतील खासगी कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून रुग्णांचे ईसीजी करण्यात येत आहे. मात्र हा तंत्रज्ञ पुरुष असल्याने अत्यवस्थ महिलांना खासगी रुग्णालयातच जावे लागत आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ याची दखल घेऊन तंत्रज्ञाची भरती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

Previous Post

पुणे पोलिसांनी मुंबईतून एका नायजेयिरन महिलेला मेफेड्रोन तस्करी प्रकरणी केली अटक

Next Post

२१ लाखांची गुंतवणुकीतून भरघोस परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक

Next Post
४३ हजार रुपयांची एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याची फसवणूक, बीकेसी पोलिसांकडून तपास सुरू

२१ लाखांची गुंतवणुकीतून भरघोस परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक

BreakingNews

उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारतासमोर आज ‘करा किंवा मरा’चा सामना!

स्विगी डिलिव्हरी भागीदारांसाठी मोठी सुविधा; आता १०० रुपयांपासून करता येणार गुंतवणूक!

पुण्यात पनीरऐवजी ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर; अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई, परवाने जप्त!

हॉटेल्समध्ये मिनरल वॉटरची सक्ती बंद! मोफत पिण्याचे पाणी देणे बंधनकारक – तुकाराम मुंढेंचे आदेश

महाराष्ट्राची डिजिटल झेप : नागरिकांसाठी अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाकडे वाटचाल

पगार हवाय? मग आधी ई-केवायसी करा! जिल्हा परिषद प्रशासनाचा कर्मचाऱ्यांना कडक इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.