Lokrakshanay
Tuesday, October 27, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मतदार वगळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 26, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
मतदार वगळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : महाराष्ट्रातील विशेष पुनरीक्षण मोहिमेदरम्यान मतदार यादीतून सुमारे ३३ टक्के मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आयोगाला उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले असून, पुढील सुनावणी ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मात्र, मतदार यादीतील नोंदणी तसेच दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत वाढवण्याची मागणी न्यायालयाने तूर्तास मान्य केलेली नाही. अरुण आनंदगिरी यांनी ही याचिका दाखल केली आहे.

सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अरविंद दातार यांनी बाजू मांडली. दातार यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये सध्या सुमारे ३,५०० पुनर्विकास प्रकल्प सुरू आहेत. जुन्या इमारती आणि सोसायट्या पाडण्यात आल्यामुळे हजारो रहिवाशांना तात्पुरते अन्य ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागले आहे. त्यामुळे त्यांच्या सध्याच्या पत्त्यांमध्ये आणि जुन्या नोंदींमध्ये तफावत निर्माण झाली असून, परिणामी अनेक मतदारांची नावे यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. आधीच्या मतदार याद्यांमध्ये नावे समाविष्ट असलेल्या नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्र अर्जाची व्यवस्था करावी, अशी मागणीही याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केली. आधीच नोंदणीकृत मतदारांना पुन्हा ‘फॉर्म-६’ भरण्यास सांगणे चुकीचे असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. हा अर्ज प्रामुख्याने प्रथमच मतदार म्हणून नोंदणी करणाऱ्यांसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत वाढवावी, तसेच न्यायालयातील सुनावणी पूर्ण होईपर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली. न्यायालयाने तूर्तास मुदतवाढ देण्यास नकार दिला असला, तरी प्रकरणाची सविस्तर सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले. आवश्यक कागदपत्रे सादर करण्यापासून नागरिक वंचित राहिल्याचे निदर्शनास आल्यास, पुढील टप्प्यावर मुदतवाढ देण्याचे निर्देश देता येतील, असे निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवले. त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या उत्तराकडे आणि ५ नोव्हेंबरच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

Previous Post

जुहू गोळीबाराच्या घटनेनंतर टायगर श्रॉफचा मोठा निर्णय; हल्ल्यानंतर अवघ्या ४ दिवसांत विकला खारमधील आलिशान फ्लॅट

Next Post

जे. जे. उड्डाणपुलाखाली पुन्हा सुरू होणार डबल डेकर बस उपहारगृह; एका बसमध्ये वाचनालयाचीही सुविधा

Next Post
जे. जे. उड्डाणपुलाखाली पुन्हा सुरू होणार डबल डेकर बस उपहारगृह; एका बसमध्ये वाचनालयाचीही सुविधा

जे. जे. उड्डाणपुलाखाली पुन्हा सुरू होणार डबल डेकर बस उपहारगृह; एका बसमध्ये वाचनालयाचीही सुविधा

BreakingNews

कोल्हापूरकरांची दिवाळी गोड! बाजारपेठेत हापूस आंब्याची दिमाखात एंट्री

जे. जे. उड्डाणपुलाखाली पुन्हा सुरू होणार डबल डेकर बस उपहारगृह; एका बसमध्ये वाचनालयाचीही सुविधा

मतदार वगळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

जुहू गोळीबाराच्या घटनेनंतर टायगर श्रॉफचा मोठा निर्णय; हल्ल्यानंतर अवघ्या ४ दिवसांत विकला खारमधील आलिशान फ्लॅट

दिवाळीपूर्वी FDA ची राज्यभर ‘फेस्टिव्ह क्रॅकडाउन’ धडक मोहीम

विदा गळती झाल्यास कंपन्यांना २५० कोटींहून अधिक दंडाची तरतूद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.