Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

३६० कोटी रुपयांचा मालमत्ता कर आर्थिक वर्षात वसूल

महापालिकेची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदा २०२३- २०२४ या आर्थिक वर्षात ३६० कोटी रुपये मालमत्ता कर जमा झाला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 1, 2024
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
३६० कोटी रुपयांचा मालमत्ता कर आर्थिक वर्षात वसूल
Share on FacebookShare on Whatsapp

पनवेल : महापालिकेची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदा २०२३- २०२४ या आर्थिक वर्षात ३६० कोटी रुपये मालमत्ता कर जमा झाला आहे. ही आजपर्यंतची सर्वात उच्चांकी रक्कम आहे. १२०० कोटी रुपये थकीत मालमत्ता कर वसूलीसाठी पालिका प्रशासनाचे तत्कालिन आयुक्त गणेश देशमुख व उपायुक्त गणेश शेटे यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याने हा उच्चांकी रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झाली. पालिका क्षेत्रातील साडेतीन लाख करदात्यांपैकी अजूनही हजारो करदात्यांनी कर जमा केलेला नाही. त्यामुळे या करदात्यांना दंड लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पालिकेमध्ये आजपर्यंत ६४७ कोटी रुपये इतका महसूल जमा झाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल असून न्यायालयाने आजपर्यंत करवसूलीसाठी पालिकेला कोणतीही स्थगिती दिली नसल्याने पालिकेने कर वसूलीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील महिन्यात (मार्च) पालिकेचे अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, तत्कालिन उपायुक्त गणेश शेटे, मालमत्ता कर विभागाचे सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, कर अधिक्षक महेश गायकवाड आणि सुनील भोईर यांच्या नेतृत्वाखाली चारही विविध प्रभाग अधिकारी यांनी मार्च महिना संपेपर्यंत १७ वेगवेगळी पथके तयार करुन या पथकांमधील कर्मचाऱ्यांनी करदात्यांकडून करवसूलीसाठी सुट्टी न घेता शनिवार, रविवारी देखील कार्यालये सुरू ठेवली होती. पालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व्यावसायिक करधारकांकडून वसुलीची थेट कारवाई सुरु केली. मार्च महिन्यात ५२ कोटी रुपयांचा कर वसूल झाला. यामध्ये ३० मार्च या एकाच दिवशी १२ कोटीची विक्रमी वसुली झाली. तसेच रविवारी ३.६० कोटी रुपयांची उच्चांकी वसुली झाली आहे.

Previous Post

पाणी टंचाईबाबतच्या नियोजनासाठी आतापासूनच तयारीला लागा

Next Post

३ हजार १९६ कोटींचा मालमत्ता कर एका वर्षात वसुल केला; मुंबई महापालिकेची छप्परफाड कमाई!

Next Post
कृत्रिम पावसासाठी पालिका आता निविदा मागवणार; पाच देशी कंपन्या स्पर्धेत

३ हजार १९६ कोटींचा मालमत्ता कर एका वर्षात वसुल केला; मुंबई महापालिकेची छप्परफाड कमाई!

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.