Lokrakshanay
Thursday, April 23, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

कबुतराचा जीव वाचवताना २८ वर्षीय अग्निशामक दलाच्या जवानाचा मृत्यू

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 13, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
कबुतराचा जीव वाचवताना २८ वर्षीय अग्निशामक दलाच्या जवानाचा मृत्यू
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : अग्निशामक दलाचे जवान जीव धोक्यात टाकून जनसेवा करत असतात. अनेकदा आगीच्या मोठ्या दुर्घटना घडतात. यावेळी अग्निशामक दलाचे जवान मदतीसाठी पुढे धावतात. तसेच नदीपात्रात एखादी व्यक्ती अडकली असेल, एखाद्या मोठ्या इमारतीवर कुणी अडकलं असेल किंवा भूसख्खलनाच्या घटना असतील, अशा अनेक संकट काळात अग्निशामक दलाचे जवान मदतीसाठी पुढे असतात. पण मदतकार्यत कधीकधी एखादी घटना अशी घडते की ती जवानाच्या जीवावर बेतते. ठाणे जिल्ह्यातील दिव्यातील एका गावात अशी दुर्देवी घटना घडली आहे.

दिव्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कबुतराचा जीव वाचवताना अग्निशामक दलाच्या जवानाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उत्सव अशोक पाटील असं या जवानाचं नाव होते. हा जवान अवघ्या २८ वर्षांचा होता. दिव्यातील दातीवली गावचे ते रहिवासी होते. कर्तव्य बजावत असताना त्यांचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संबंधित घटना ही रविवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. उत्सव पाटील हे अत्यंत तत्पर आणि जबाबदार जवान म्हणून ओळखले जात होते. खर्डीगाव येथील ओव्हरहेड वायर्सवर एक कबूतर अडकले असल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं होतं. अग्निशामक दलाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले होते. यावेळी बचाव मोहिमेत सहभागी असलेल्या उत्सव पाटील यांना विजेचा तीव्र धक्का बसून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली.

Previous Post

महिलेची जमीन बळकावून २५ लाखांची खंडणी प्रकरणी गुंड टिपू पठाणसह साथीदारांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

Next Post

ठाण्यात महापालिकेच्या कारवाईविरोधात आदिवासी कुटुंबांचे आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांकडे पुनर्वसनाची मागणी

Next Post
ठाण्यात महापालिकेच्या कारवाईविरोधात आदिवासी कुटुंबांचे आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांकडे पुनर्वसनाची मागणी

ठाण्यात महापालिकेच्या कारवाईविरोधात आदिवासी कुटुंबांचे आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांकडे पुनर्वसनाची मागणी

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.