Lokrakshanay
Thursday, October 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

राज्यातील शाळा, अंगणवाड्या आणि आदिवासी वस्त्यांना सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी शासनाचे महत्त्वाचे निर्देश

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 29, 2026
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
राज्यातील शाळा, अंगणवाड्या आणि आदिवासी वस्त्यांना सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी शासनाचे महत्त्वाचे निर्देश
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : राज्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या तसेच आदिवासीबहुल आणि दुर्गम भागांतील वंचित वाड्या-वस्त्यांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये नियमित पाणीपुरवठा, स्वच्छतागृहांसाठी पाणी आणि हात धुण्याची सुविधा अखंड सुरू ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. ज्या आदिवासी वाड्या-वस्त्या अद्याप नळजोडणीपासून वंचित आहेत, त्यांचा योजनांमध्ये समावेश करण्यासाठी संबंधित प्रस्ताव १५ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कक्ष अधिकारी अंजली बोडके यांनी ही माहिती दिली. राज्यात जल जीवन मिशनअंतर्गत शाळा आणि अंगणवाड्यांसाठी ६,६२९ पाणीपुरवठा योजना मंजूर असून, त्यापैकी ६,३५७ योजना पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित २७२ योजना सध्या प्रगतिपथावर आहेत. पूर्ण झालेल्या योजनांमधून दर्जेदार पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांसाठी पाणी आणि हात धुण्याची सुविधा कार्यान्वित असल्याची खात्री जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. अपूर्ण योजनांची कामे पूर्ण होईपर्यंत जवळील योजनांमधून तात्पुरती नळजोडणी, टँकर किंवा पाण्याच्या टाक्यांद्वारे पर्यायी व्यवस्था करण्यासही सांगण्यात आले आहे.

याशिवाय, असुरक्षित आदिवासी समूह (पीव्हीटीजी) आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (डीएजेजीयूए) अंतर्गत दुर्गम आदिवासी वस्त्यांना प्राधान्याने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पीव्हीटीजी अंतर्गत समाविष्ट १६ जिल्ह्यांमध्ये ४,३५२ योजना मंजूर असून, त्यापैकी २,१८७ योजना पूर्ण झाल्या आहेत, तर २,१६५ योजना प्रगतिपथावर आहेत. या सर्व योजना डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आदिवासीबहुल भागांतील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांसह नळांद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याची वर्षातून एकदा रासायनिक आणि दोनदा जैविक तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रशिक्षित महिला स्वयंसेवकांकडून दरमहा जैविक तपासणी केली जाणार आहे. वंचित वाड्या-वस्त्यांची लोकसंख्या, आवश्यक नळजोडण्या, वितरण व्यवस्था आणि अतिरिक्त निधीचा तपशील तयार करून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे शाळा, अंगणवाड्या आणि दुर्गम आदिवासी भागांमध्ये सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

AI च्या माध्यमातून पुन्हा पडद्यावर ‘लक्ष्या’; ‘मिशन भाऊचा धक्का’ २७ नोव्हेंबरला यूट्यूबवर प्रदर्शित

Next Post

भविष्यातील तंत्रज्ञानात भारताने जगाचं नेतृत्व करावं; पंतप्रधान मोदींचं आवाहन

Next Post
भविष्यातील तंत्रज्ञानात भारताने जगाचं नेतृत्व करावं; पंतप्रधान मोदींचं आवाहन

भविष्यातील तंत्रज्ञानात भारताने जगाचं नेतृत्व करावं; पंतप्रधान मोदींचं आवाहन

BreakingNews

भविष्यातील तंत्रज्ञानात भारताने जगाचं नेतृत्व करावं; पंतप्रधान मोदींचं आवाहन

राज्यातील शाळा, अंगणवाड्या आणि आदिवासी वस्त्यांना सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी शासनाचे महत्त्वाचे निर्देश

AI च्या माध्यमातून पुन्हा पडद्यावर ‘लक्ष्या’; ‘मिशन भाऊचा धक्का’ २७ नोव्हेंबरला यूट्यूबवर प्रदर्शित

महामानवाला अभिवादनासाठी मुंबई सज्ज! चैत्यभूमीवरील हायटेक सुविधांसाठी ३० कोटींचा निधी

सणासुदीला महागाईचा फटका; कांदा ८०, लसूण ४०० रुपयांवर!

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनासाठी १७४ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.