Lokrakshanay
Thursday, October 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

महामानवाला अभिवादनासाठी मुंबई सज्ज! चैत्यभूमीवरील हायटेक सुविधांसाठी ३० कोटींचा निधी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 29, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
महामानवाला अभिवादनासाठी मुंबई सज्ज! चैत्यभूमीवरील हायटेक सुविधांसाठी ३० कोटींचा निधी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर अभिवादनासाठी देशभरातून लाखो अनुयायी मुंबईत येण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षेची तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. या सर्व व्यवस्थांसाठी सुमारे २५ ते ३० कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापरिनिर्वाण दिनादरम्यान चैत्यभूमी, शिवाजी पार्क तसेच दादरसह विविध रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी होत असल्याने अनुयायांची गैरसोय होऊ नये आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सामाजिक न्याय विभागाने वृत्तपत्रांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करावा, तसेच शिवाजी पार्क परिसरात पुस्तकांचे स्टॉल उभारून शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असेही निर्देश देण्यात आले. या सर्व सुविधांसाठी मुंबई महापालिकेने आवश्यक निधीची तरतूद करून प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असेही बनसोडे यांनी स्पष्ट केले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला, वांद्रे आणि मुंबई सेंट्रल या प्रमुख रेल्वे स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. गरजेनुसार अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविणे आणि ६ डिसेंबर रोजी मेगाब्लॉक टाळण्याबाबत रेल्वे प्रशासनाने विचार करावा, तर एसटी महामंडळानेही अतिरिक्त बससेवांचे नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविणे, सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या सहाय्याने गर्दीवर लक्ष ठेवणे तसेच वाहतुकीतील बदलांची माहिती नागरिकांना आगाऊ देण्यावर भर देण्यात आला आहे. याशिवाय ५ आणि ६ डिसेंबर रोजी वैद्यकीय तपासणी, आरोग्य जनजागृती आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीमही राबविण्यात येईल. तसेच ६ डिसेंबर रोजी ‘ड्राय डे’ जाहीर करण्याबाबत आणि सार्वजनिक सुट्टीसंदर्भातील आवश्यक परिपत्रके वेळेत काढण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Previous Post

सणासुदीला महागाईचा फटका; कांदा ८०, लसूण ४०० रुपयांवर!

Next Post

AI च्या माध्यमातून पुन्हा पडद्यावर ‘लक्ष्या’; ‘मिशन भाऊचा धक्का’ २७ नोव्हेंबरला यूट्यूबवर प्रदर्शित

Next Post
AI च्या माध्यमातून पुन्हा पडद्यावर ‘लक्ष्या’; ‘मिशन भाऊचा धक्का’ २७ नोव्हेंबरला यूट्यूबवर प्रदर्शित

AI च्या माध्यमातून पुन्हा पडद्यावर ‘लक्ष्या’; ‘मिशन भाऊचा धक्का’ २७ नोव्हेंबरला यूट्यूबवर प्रदर्शित

BreakingNews

AI च्या माध्यमातून पुन्हा पडद्यावर ‘लक्ष्या’; ‘मिशन भाऊचा धक्का’ २७ नोव्हेंबरला यूट्यूबवर प्रदर्शित

महामानवाला अभिवादनासाठी मुंबई सज्ज! चैत्यभूमीवरील हायटेक सुविधांसाठी ३० कोटींचा निधी

सणासुदीला महागाईचा फटका; कांदा ८०, लसूण ४०० रुपयांवर!

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनासाठी १७४ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर

ठाणे जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची सीईओ रणजित यादव यांच्याकडून पाहणी

ससून गोदीतील महिला मच्छीमारांना सुरक्षा किट; आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.