शहापूर ः राष्ट्रीय भावना आणि राष्ट्रप्रेमाच्या समविचारातून अनेक संघटना देशभरात काम करत असतात. त्या संघटनांनी एकत्रितपणे काम केले, तर त्यांच्या कार्याला एक ठोस राष्ट्रीय आकार मिळतो तसेच समान विचार असलेले काम अधिक गतीने पुढे नेता येते. या विचाराने रविवारी शहापुरात जोंधळे महाविद्यालय येथे अखिल भारतीय अधिवक्ता परिषद संपन्न झाली. यावेळी नवीन सदस्यांची नाव नोंदणी, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आले. अधिवक्ता परिषद ठाणे जिल्हा अध्यक्ष राजन साळुंखे यांचे अभ्यास वर्गाबाबत प्रास्ताविक झाले. प्रमुख अतिथी जिल्हा न्यायाधीश दुर्गाप्रसाद देशपांडे, ठाणे यांचे मार्गदर्शन व वरीष्ठ अधिवक्ता गजानन चव्हाण यांचे Medical Jurisprudence या विषयावर व्याख्यान पार पडले. अधिवक्ता परिषद कोकण प्रांत महामंत्री आकाश कोटेचा यांनी अधिवक्ता परिषदेबाबत प्रस्तावना सादर करत आयामांबाबत माहिती दिली. 1.लिटीगेशन – अधिवक्ता प्रकाश सालसिंगीकर, मुंबई
2.आऊटरीच- अधिवक्ता प्रियाताई लोवलेकर, रत्नागिरी 3.संघटन – अधिवक्ता श्रीराम रेडिज, मुंबई 4.नॉलेज कलेक्टीव्ह अधिवक्ता श्रीराम ठोसर, अलिबाग वरीष्ठ अधिवक्ता राजेंद्र अनभुले यांचे How to apply Law of precedent in Trial Court Practice: Judicial Analysis या विषयावर व्याख्यान व वरीष्ठ अधिवक्त पारिजात पांडे यांचे मार्गदर्शन, वरीष्ठ अधिवक्ता संजय बोरकर यांचे Key notes on Civil Suit and Civil Trial या विषयावर मार्गदर्शन केले व अधिवक्ता दीपक गायकवाड यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सध्याच्या वक्फ अधिनियम मधील भयानक तरतुदी आणि त्यामधील प्रस्तावित सुधारणा अत्यंत समर्पकरित्या मांडल्या . तसेच भारताबरोबर जे देश स्वतंत्र झाले त्या देशात स्थायी लोकशाही व्यवस्था नाही. भारतात लोकशाही व्यवस्था स्थायी असून दिवसेंदिवस ती अधिक मजबूत असण्याचे कारण म्हणजे या देशात बहुसंख्य असलेले हिंदू होय. ठाणे जिल्हा अधिवक्ता परिषद ची पुनर्रचना होऊन केवळ वर्ष पूर्ण होत असताना 400 पेक्षा जास्त वकील उपस्थित राहणे चांगले संकेत आहेत असेही प्रतिपादन अधिवक्ता दीपक गायकवाड यांनी केले. शेवटी अधिवक्ता परिषद शहापूर तालुका अध्यक्ष दीपक बोटकोंडले यांनी आभार प्रदर्शन केले.