Lokrakshanay
Thursday, June 25, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लाखो भाविकांचे रामदर्शन अन् कोट्यवधींचे दान

राम मंदिरात वर्षभरात १२ प्रमुख सण आणि उत्सव साजरे केले जाणार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 3, 2024
in ताज्या बातम्या, देश -विदेश
लाखो भाविकांचे रामदर्शन अन् कोट्यवधींचे दान
Share on FacebookShare on Whatsapp

अयोध्या :  २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात रामलला विराजमान झाले. रामदर्शनाची आस लागलेल्या लाखो भाविकांनी आतापर्यंत अयोध्या वारी केली आहे. राम मंदिराला मोठ्या प्रमाणात दान-देणगीही दिली जात आहे. पहिल्या १० दिवसांत राम मंदिराला १२ कोटींची दान प्राप्त झाले आहे. ऑनलाइनच्या माध्यमांतूनही राम मंदिरासाठी देणगी दिली जात आहे. रामभक्त रामललाच्या दरबारात खुल्या दिलाने दान करत आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून राम मंदिरासाठी देणगी दिली जात आहे. २३ जानेवारीला राम मंदिर सर्वसामान्य भक्तांसाठी खुले झाल्यापासून भाविकांची गर्दी होत आहे. गेल्या दहा दिवसांत रामललाला सुमारे १२ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. २२ जानेवारीलाच राम मंदिरात ३.१७ कोटी रुपयांची देणगी मिळाली होती.

राम मंदिरात दररोज सरासरी दोन ते अडीच लाख भाविक राम दर्शन घेण्यासाठी येतात. तर मिळालेल्या माहितीनुसार, २३ तारखेला २.६२ कोटी रुपयांचे धनादेश, २७ लाख रोख, २४ जानेवारीला १५ लाख रुपयांचे धनादेश आणि रोख, २५ जानेवारीला ४० हजार रुपयांचा धनादेश अन् ८ लाख रुपये रोख, २६ जानेवारीला ०१,०४,६० हजार रुपयांचे धनादेश अन् ५.५० लाख रुपये रोख, २७ जानेवारीला १३ लाखांचे धनादेश अन् ८ लाख रुपये रोख, २८ जानेवारीला १२ लाखांचे धनादेश आणि रोख, २९ जानेवारीला ७ लाख रुपयांचा धनादेश अन् ५ लाख रुपये रोख दान आले आहे. या आकडेवारीनुसार राम मंदिरासाठी येणारे दान हे दानपेटीत टाकल्या जाणाऱ्या दानापेक्षा वेगळे आहे. एका अंदाजानुसार, दानपेटीत दररोज ३ लाख रुपयांची देणगी टाकली जात आहे.

वार्षिक उत्सवांचे वेळापत्रक आले..

मुख्यमंत्री योगी यांच्यासह भाजपचे सर्व आमदार ११ फेब्रुवारीला रामललाचे दर्शन घेणार आहेत. नव्याने बांधलेल्या राम मंदिराचे वार्षिक उत्सवांचे वेळापत्रक तयार आहे. नवीन मंदिरात १४ फेब्रुवारीला वसंती पंचमी हा पहिला उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. यामध्ये देवी सरस्वतीची पूजा केली जाणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. राम मंदिरात वर्षभरात १२ प्रमुख सण आणि उत्सव साजरे केले जाणार आहेत.

 

Previous Post

नागरिकांच्या सहभागातून पुणे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणार : मा.अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे

Next Post

तुम्ही मनुके खात असाल तर त्याचे जाणून घ्या ४ आश्चर्यकारक फायदे

Next Post
तुम्ही मनुके खात असाल तर त्याचे जाणून घ्या  ४  आश्चर्यकारक फायदे

तुम्ही मनुके खात असाल तर त्याचे जाणून घ्या ४ आश्चर्यकारक फायदे

BreakingNews

खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी ‘सर्वंकष अन्न सुरक्षा अनुपालन आदेश’; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश

उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारतासमोर आज ‘करा किंवा मरा’चा सामना!

स्विगी डिलिव्हरी भागीदारांसाठी मोठी सुविधा; आता १०० रुपयांपासून करता येणार गुंतवणूक!

पुण्यात पनीरऐवजी ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर; अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई, परवाने जप्त!

हॉटेल्समध्ये मिनरल वॉटरची सक्ती बंद! मोफत पिण्याचे पाणी देणे बंधनकारक – तुकाराम मुंढेंचे आदेश

महाराष्ट्राची डिजिटल झेप : नागरिकांसाठी अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाकडे वाटचाल

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.