Lokrakshanay
Saturday, May 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पुणे महापालिका आयुक्तांच्या गाडीवर ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी चिकटवले सॅनिटरी नॅपकिन

१६ आंदोलनकर्त्यांविरोधात सरकारी मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 3, 2024
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
पुणे महापालिका आयुक्तांच्या गाडीवर ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी चिकटवले सॅनिटरी नॅपकिन
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींसाठीच्या सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठीच्या निविदा मिळण्यासाठी भाजपच्या आमदार-खासदारांमध्ये सुरू असलेल्या चढाओढीवर काँग्रेसने आणि आम आदमी पक्षाने बुधवारी आरोप केले.  त्यानंतर आपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या शासकीय वाहनावर सॅनिटरी नॅपकिन चिकटवून निषेध नोंदवला. या प्रकारानंतर ‘आप’च्या १६ पदाधिकारी-कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सॅनिटरी नॅपकिन निविदा प्रक्रियेत भाजपच्या आमदार व खासदाराने त्यांच्या मर्जीतील ठेकेदाराला कंत्राट देण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोप काँग्रेस आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता.
दरम्यान, महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींना त्वरित सॅनिटरी नॅपकिन वाटले जावेत, अशी मागणी करण्यासाठी ‘आप’चे पदाधिकारी, कार्यकर्ते गुरुवारी (ता. १) महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी महापालिकेच्या आवारातील पार्किंगमध्ये असलेल्या आयुक्तांच्या गाडीवर सॅनिटरी नॅपकिन चिटकवून या घटनेचा निषेध व्यक्त केला. या घटनेनंतर, शिवाजीनगर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी महापालिकेच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख राकेश विटकर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर रात्री उशिरा १६ आंदोलनकर्त्यांविरोधात सरकारी मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली.

Previous Post

मुंबई महापालिकेचा ५९ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर

Next Post

गोविंद पानसरे स्मारकाचे लोकार्पण २० फेब्रुवारीला करा, भाकप कार्यकर्त्यांची मागणी

Next Post
गोविंद पानसरे स्मारकाचे लोकार्पण २० फेब्रुवारीला करा, भाकप कार्यकर्त्यांची मागणी

गोविंद पानसरे स्मारकाचे लोकार्पण २० फेब्रुवारीला करा, भाकप कार्यकर्त्यांची मागणी

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.