Lokrakshanay
Friday, May 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

वसईत वनपाल आणि वनरक्षक यांना १ लाख ३० हजारांच्या लाच प्रकरणी एसीबीने केली अटक

वनरक्षक पन्नालाल बेलदार (३५) आणि वनपाल पंकज सनेर (४५) अशी अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 28, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
वसईत वनपाल आणि वनरक्षक यांना १ लाख ३० हजारांच्या लाच प्रकरणी एसीबीने केली अटक
Share on FacebookShare on Whatsapp

वसई : वनविभागाच्या वसई गोखिवरे रेंजनाका वाघराळ बिट परिमंडळ कार्यालयातील वनपाल व वनरक्षक या दोन कर्मचाऱ्यांना १ लाख ३० हजारांच्या लाच प्रकरणी पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. वनरक्षक पन्नालाल बेलदार (३५) आणि वनपाल पंकज सनेर (४५) अशी अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तक्रारदार यांच्या मालकीची मुंबई-अहमदाबाद महामार्गावर समांतर चाळ आहे. सदर चाळीतील खोल्यांना महामार्गाच्या विरुध्द बाजूने दरवाजे आहेत. तक्रारदार यांनी या चाळीतील खोल्यांना येण्याजाण्याच्या सोयीसाठी महामार्गाच्या दिशेने दरवाजा काढण्याचे काम सुरु केले होते.

यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराला कार्यालयात बोलावून महामार्गाची बाजू ही वन विभागाची हद्द असून त्या बाजूला दरवाजे काढले असल्याने त्यांना वन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल अशी धमकी दिली होती.  त्यावेळी तक्रारदाराने कारवाई न करण्याची विनंती केली. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी प्रत्येक खोलीमागे ८० हजार रुपये अशी ३ खोल्यांसाठी लाचेची मागणी केली होती. कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराने रकमेपैकी ९० हजार रुपये १६ सप्टेंबरला दिले. उर्वरित पैशांसाठी २५ सप्टेंबर पर्यंत मुदत मागितली होती. मात्र वनकर्मचाऱ्यांनी पैशांसाठी तगादा लावल्याने तक्रारदाराने पालघरच्या लाचलुचपत विभागात तक्रार केली.

या तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाने गोखिवरेच्या रेंज नाका येथील वनविभागाच्या कार्यालयात सापळा रचून  वनरक्षक पन्नालाल याला ४० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.त्यानंतर वनपाल पंकज सनेर यालाही अटक केले आहे.पडताळणीत दोघांनी ९० हजार रुपये स्विकारले असून उर्वरित रक्कम तडजोडीअंती १ लाख ३० हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण यांनी सांगितले आहे. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

मनू भाकरने ती वापरत असलेल्या पिस्तुलाबाबत स्वतःच केला खुलासा

Next Post

गुप्ताचर विभागाच्या इशाऱ्यावरून मुंबईतील धार्मिक स्थळांवर पोलिसांची असणार करडी नजर

Next Post
गुप्ताचर विभागाच्या इशाऱ्यावरून मुंबईतील धार्मिक स्थळांवर पोलिसांची असणार करडी नजर

गुप्ताचर विभागाच्या इशाऱ्यावरून मुंबईतील धार्मिक स्थळांवर पोलिसांची असणार करडी नजर

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.