Lokrakshanay
Saturday, May 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

नवी मुंबईत कृत्रिमरीत्या आंबे पिकवण्यासाठी रसायनांचा वापर; FDA आणि APMC प्रशासनाची संयुक्त कारवाई

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 6, 2026
in गुन्हेगारी, ठाणे, ताज्या बातम्या, नवी मुंबई
नवी मुंबईत कृत्रिमरीत्या आंबे पिकवण्यासाठी रसायनांचा वापर; FDA आणि APMC प्रशासनाची संयुक्त कारवाई
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी (APMC) फळ बाजारातून अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून, आंबे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून ग्राहकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. “आपण खातो तो आंबा नैसर्गिक आहे की केमिकलयुक्त?” असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका जागरूक ग्राहकाला बाजारात काही व्यापारी उघडपणे आंब्यांवर रसायनांची फवारणी करताना दिसले. संबंधित प्रकार लक्षात येताच अन्न व औषध प्रशासनाला (FDA) माहिती देण्यात आली. त्यानंतर FDA आणि APMC प्रशासन तात्काळ सतर्क झाले आणि संयुक्त पथकाने बाजारात धडक कारवाई करत संशयित व्यापाऱ्यांच्या गाळ्यांवर छापे टाकले. या कारवाईदरम्यान संशयित आंब्यांचे नमुने जप्त करण्यात आले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे बाजारात विक्री होणाऱ्या फळांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

उन्हाळ्याच्या हंगामात बाजारात मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे आंबे विक्रीस येतात आणि ग्राहकही मोठ्या उत्साहाने त्यांची खरेदी करतात. मात्र, केमिकल वापरून कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्यांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा आंब्यांमुळे पोटाचे विकार, अ‍ॅलर्जी तसेच इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, नैसर्गिक आणि रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांमधील फरक ओळखण्याचे आवाहनही फळ तज्ज्ञांनी केले आहे. नैसर्गिकरीत्या पिकलेल्या आंब्याचा रंग साधारणपणे एकसारखा नसतो आणि त्यात हिरवट-पिवळ्या छटा दिसतात. अशा आंब्याला गोड नैसर्गिक सुगंध असतो आणि तो हातात घेतल्यावर सर्व बाजूंनी मऊ जाणवतो. याउलट, केमिकलने पिकवलेला आंबा पूर्णपणे गडद पिवळा दिसतो, त्याला नैसर्गिक वास नसतो किंवा औषधासारखा गंध येतो. बाहेरून मऊ वाटणारा असा आंबा आतून कडक असण्याची शक्यता अधिक असते. नागरिकांनी आंबे खरेदी करताना काळजी घ्यावी, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांना देताना सतर्क राहावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. सुरक्षित अन्नपुरवठ्यासाठी प्रशासनाने अधिक कठोर नियंत्रण ठेवण्याची मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.

Previous Post

अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू

Next Post

ठाण्यात अनेक भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन

Next Post
ठाण्यात अनेक भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन

ठाण्यात अनेक भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.