Lokrakshanay
Thursday, July 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

उरण हादरले! अडीच लाखांचे ड्रग्ज पकडले; शाळा-कॉलेजची मुले नशेच्या जाळ्यात?

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 13, 2026
in गुन्हेगारी, नवी मुंबई
उरण हादरले! अडीच लाखांचे ड्रग्ज पकडले; शाळा-कॉलेजची मुले नशेच्या जाळ्यात?
Share on FacebookShare on Whatsapp

उरण : उरण तालुक्यात चरस गांजा करणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण वाढत असून उरण मध्ये अनेक ठिकाणी खुलेआम पणे नशेचा बाजार सुरु आहे. अनेक ठिकाणी या नशेली पदार्थांची खरेदी विक्री मोठया प्रमाणात सुरु असून या व्यसनाला उरण मधील शाळा, कॉलेज मधील तरुण मुले सर्वाधिक बळी पडत आहेत त्यामुळे तरुण पिढी नशेच्या आहारी जात असल्यामुळे आरोग्यच्या दृष्टीने खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय हिच नशा करणारी  व्यक्ती पुढे गंभीर गुन्ह्याकडे वळतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून हा नशेचा बाजार रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

उरण पोलिसांनी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या व त्याचे सेवन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी शुक्रवारी दुपारी जासई येथील पार्किंगमध्ये छापा मारून अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तरुणासह त्याचे सेवन करणाऱ्या दोघांना असे एकूण तीन जणांना अटक करीत २ लाख ५२ हजार ८०० रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे. तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उरण तालुक्यातील जासई येथील शीतल परिवहन पार्किंगच्या मागे असलेल्या जांभळाच्या झाडाखाली काही तरुण संशयास्पद अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे उरण पोलिसांनी १० एप्रिल रोजी दुपारी २ च्या सुमारास छापा मारला. यावेळी तेथे रवींद्र कल्याण शेट्टी (२७), गणेश दत्तू भिडे (२५) व गणेश विनय पाटील (१९) हे तिघेही अमली पदार्थाचे सेवन करताना आढळले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता, गणेश पाटील याच्याकडे ६.३२ ग्रॅम वजनाची हेरॉईनच्या ८५ पुड्या सापडल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात अमली पदार्थाची किंमत अंदाजे २,५२,८०० रुपये आहे. या कारवाईत तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांनाअटक केल्याची माहिती वपोनि हनिफ मुलाणी यांनी दिली. तिघांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांनी सांगितले. उरण मध्ये मोठया प्रमाणात नशेच्या औषधांची विक्री खरेदी मोठया प्रमाणात होत असून अशा खरेदी विक्री करणाऱ्या व्यक्ती वर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे उरण मधील विविध सामाजिक संस्था संघटनानीं केली आहे.

Previous Post

नाशिक गृहनिर्माण घोटाळा; बिल्डरांनी हडपलेली २० टक्के जागा ‘म्हाडा’ परत घेणार

Next Post

बाबासाहेब म्हणजे दूरदृष्टी असणारा आदर्श नेता

Next Post
बाबासाहेब म्हणजे दूरदृष्टी असणारा आदर्श नेता

बाबासाहेब म्हणजे दूरदृष्टी असणारा आदर्श नेता

BreakingNews

आता Swiggy Instamart वरून LPG सिलिंडरही मिळणार घरपोच; HPCL सोबत भागीदारी

ठाण्यात ‘NAMASTE दिन’ उत्साहात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडण्यावर भर

दिल्ली मेट्रोची नवी मोहीम; १० स्थानकांवर ‘अर्पण’ केंद्रांद्वारे जुन्या कपड्यांचे रिसायकलिंग!

देशातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकार आणणार ‘फ्लाईंग बस’; नितीन गडकरींची मोठी घोषणा

रेल्वे हद्दीपासून ३० मीटरच्या परिसरात बांधकामासाठी रेल्वेची NOC बंधनकारक!

बलुचिस्तानचा धक्कादायक दावा! स्वतःला ‘स्वतंत्र देश’ घोषित करत ८५ टक्के भागावर मिळवला ताबा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.