Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण, अमित ठाकरेसह ७० मनसेसैनिकांवर गुन्हा दाखल!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 17, 2025
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण, अमित ठाकरेसह ७० मनसेसैनिकांवर गुन्हा दाखल!
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळमध्ये राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मागील चार महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत झाकून ठेवण्यात आला होता. ही बाब कळताच मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी कोणतीही परवानगी न घेता पुतळ्याचे अनावरण केले. या कृतीनंतर पोलिसांनी त्यांच्यासह सुमारे ७० मनसेसैनिकांवर गुन्हा दाखल केला. हा अमित ठाकरे यांच्या कारकिर्दीतील पहिलाच गुन्हा असल्याची माहिती समोर आली आहे.

अमित ठाकरे हे कौपरखैरणे येथे मनसे शाखेच्या उद्घाटनासाठी आले असताना त्यांना महाराजांची मूर्ती कापडाने झाकून ठेवल्याची माहिती मिळाली. ही स्थिती पाहताच त्यांनी मनसैनिकांसह त्या ठिकाणी जाऊन पोलिसांच्या उपस्थितीतच पुतळा उघडला. अनावरणावेळी मनसैनिक आणि पोलिसांमध्ये किरकोळ ढकलाढकली झाली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे म्हणाले की, पुतळा चार महिन्यांपासून झाकून ठेवला असल्याने त्यावर धूळ साचत होती. लोकांच्या मागणीनुसार उभारलेल्या पुतळ्याचे कोणत्याही मंत्री किंवा नेत्यानं अनावरण न केल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. “आपण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य मानतो त्यांच्यासाठी वेळ मिळत नाही, हीच सर्वात दुर्दैवी बाब आहे,” असे ते म्हणाले. गुन्हा दाखल होण्याबाबत प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे म्हणाले, “ही माझ्या आयुष्यातली पहिली केस असेल, पण महाराजांसाठी अशा कित्येक केसेस अंगावर घ्यायला मी तयार आहे.” त्यांच्या या भूमिकेमुळे मनसैनिकांनीही जोरदार समर्थन व्यक्त केले. नवी मुंबईत मागील काही दिवसांत अनेक मोठे नेते आणि मंत्री येऊनही पुतळ्याचे अनावरण न झाल्याबाबत त्यांनी टीकास्त्र सोडले.

Previous Post

Sparkling Champs: A Celebration of Talent and Values at WISDOM Coaching Classes

Next Post

दुबईमध्ये किंग खानच्या नावाने बांधला जाणार एक भव्य टॉवर!

Next Post
दुबईमध्ये किंग खानच्या नावाने बांधला जाणार एक भव्य टॉवर!

दुबईमध्ये किंग खानच्या नावाने बांधला जाणार एक भव्य टॉवर!

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.