वृत्तसंस्था : केंद्र सरकारने आधार कार्डाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता लहान मुले आणि अल्पवयीन मुलांची नवीन नोंदणी आणि बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाही. या आधी सुविधेसाठी ५० रुपये शुल्क आकारले जात होते.
नव्या नियमानुसार, ५ ते ७ आणि १५ ते १७ वयोगटातील मुलांसाठी आधार कार्डाच्या अपडेटचे शुल्क माफ असतील. या निर्णयाचा लाखोंना फायदा होणार आहे. केंद्र सरकारने लहान मुलांनाही आधार कार्डाचं बायोमेट्रिक अपडेट करणे सक्तीचे केलं होतं. तुम्ही जवळच्या आधार कार्ड केंद्रात डाऊन कार्डाचं अपडेट करू शकता. यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन एमआधार मोबाइल अॅप्लिकेशनचा उपयोग करून शोधू शकता. आधार कार्ड केंद्रावरून फॉर्म घेऊन भरून जमा करू शकता. तसेच बायोमेट्रिक डेटा जमा करू शकता. यासाठी फिंगरप्रिंट स्कॅन, डोळे स्कॅन करणे या दोन्ही प्रक्रिया कराव्या लागतील. सरकारने लहान मुलांसाठी आधार कार्डात बायोमेट्रिक अपडेट करणे बंधनकारक केलं आहे. त्यामुळे लहान मुलांचही आधार कार्ड बायोमेट्रिक अपडेट करणे गरजेचे असणार आहे. यासाठी यूनिक आयडेंटिपिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे यूआयडीएआयने गाइडलाइन जारी केली होती.