Lokrakshanay
Monday, May 4, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

अभिनेता अनुपम खेर यांच्या कार्यालयातून चोरी केल्याप्रकरणी दोन जणांना अटक

प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या अंधेरीतील कार्यालयात चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात अंबोली पोलिसांना यश आले आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 22, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
अभिनेता अनुपम खेर यांच्या कार्यालयातून चोरी केल्याप्रकरणी दोन जणांना अटक
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या अंधेरीतील कार्यालयात चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात अंबोली पोलिसांना यश आले आहे. खेर यांनी स्वतः चोरी झाल्याची माहिती समाज माध्यमावरून दिली होती. या चोरांनी कार्यालयात प्रवेश करून रोख चार लाख पंधरा हजार रुपये आणि ‘मैने गांधी को क्यू मारा’ या फिल्मचे रिल चोरून नेले होते. त्यातील रोख ३४ हजार रुपये व फिल्मची रिल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेते अनुपम खेर यांच्या मालकीचे अंधेरीतील विरा देसाई मार्ग परिसरात एक कार्यालय आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री काम संपल्यानंतर कर्मचारी कार्यालय बंद करून घरी गेले होते. दुसर्‍या दिवशी एक कर्मचारी कार्यालयात आला होता, यावेळी तेथे चोरी झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरांनी कार्यालयात प्रवेश करून रोख रकमेसह फिल्म रील चोरले होते. याबाबतची माहिती कर्मचार्‍यांनी अनुपम खेर यांना दूरध्वनी करून दिली. कार्यालयातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण पाहिले असता रात्री उशीरा दोन तरुण कार्यालयात शिरल्याचे निदर्शनास आले. या दोघांनी कपाटाच्या खणातील रोख आणि फिल्म रील घेऊन पलायन केले. याबाबतची माहिती आंबोली पोलिसांना देण्यात आली. कंपनीच्या अधिकार्‍यांनी पोलिसांना सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण देऊन दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली. खेर यांच्यावतीने शांताराम पाटील यांनी ही तक्रार केली.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद केली. पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात ते दोघेही कार्यालयातून चोरी करून बाहेर आल्यानंतर एका रिक्षातून निघून गेल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी याप्रकरणी रफीक शेख (३५) व मोहम्मद दिलशान खान (३०) या चोरांना अटक केली. त्यांच्याकडून ३४ हजार रूपये व फिल्म रील पोलिसांनी हस्तगत केले. पोलीस निरीक्षक जयदेव शिंदे यांच्यासह हरीभाऊ बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी आरोपींकडून लोखंडी तिजोरीही हस्तगत केली. आरोपींविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत का याची तपासणी पोलीस करीत आहेत. तसेच आरोपींनी चोरलेली रक्कम कोठे ठेवली आहे, याबाबतही पोलीस तपास करीत आहेत.

Previous Post

उच्च न्यायालयाचा निर्वाळा; दोनपेक्षा जास्त मुले असलेली व्यक्ती गृहनिर्माण संस्थेचा समिती सदस्य म्हणून अपात्र

Next Post

देशी-विदेशी जातीचे १२ बेकायदेशीरपणे बांधलेले श्वान जप्त

Next Post
देशी-विदेशी जातीचे १२ बेकायदेशीरपणे बांधलेले श्वान जप्त

देशी-विदेशी जातीचे १२ बेकायदेशीरपणे बांधलेले श्वान जप्त

BreakingNews

‘म्हातारीचा बूट’ झळकणार नव्या रूपात; दुरुस्तीसाठी महापालिकेचे ७.५ लाखांचे पाऊल!

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.