Lokrakshanay
Monday, May 4, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सराईत आरोपींना अटक

गोरेगाव येथे दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तीन सराईत आरोपींना अटक करण्यात दिंडोशी पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 22, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
कामावरून काढून टाकल्याचा राग, कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला; चौघा हल्लेखोरांपैकी एकाला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : गोरेगाव येथे दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तीन सराईत आरोपींना अटक करण्यात दिंडोशी पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले. आरोपींकडून दरोड्यात वापरण्यात येणारी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्याविरोधात यापूर्वी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी परिसरातील मोठे दुकान लुटण्याच्या प्रयत्नात होते. मोहम्मद अली रफिक अन्सारी, सलमान मोहम्मद रफिक अन्सारी आणि नफीस मोहम्मद चौधरी ऊर्फ चपटा अशी या तिघांची नावे असून ते तिघेही गोरेगावच्या जी. वॉर्ड, बीएमसी कॉलनीतील रहिवासी आहेत. गोरेगामधील साईबाबा कॉम्प्लेक्स येथील ओम सत्यम सुपर मार्केट नावाचे एक दुकान आहे. या दुकानात रात्रीच्या वेळेस दरोड्याच्या उद्देशाने काहीजण येणार असल्याची माहिती दिडोंशी पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी तिथे आधीपासून साध्या वेशात पाळत ठेवली होती. रात्री उशिरा तिथे सहा जण आले, त्यांची हालचाल संशयास्पद वाटताच पोलिसांनी सहापैकी तिघांना शिताफीने ताब्यात घेतले होते.

पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन लोखंडी कटावणी, दोन सुरे, तलवार, मिरचीची पूड आदी मुद्देमाल सापडला. चौकशीत ते तिघेही तेथे दरोड्याच्या उद्देशाने आल्याचे उघडकीस आले. दिंडोशी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार हेमंत रोडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात दरोड्याच्या तयारीत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. मोहम्मद अलीविरुद्ध सात, सलमान मोहम्मदविरुद्ध आठ, तर नफीसविरुद्ध तीन गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या कारवाईदरम्यान त्यांचे तीन सहकारी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. चौकशीत त्यांची माहिती मिळाली असून याप्रकरणी पोलीस संशयीत आरोपींचा शोध घेत आहेत.

Previous Post

येत्या काळात मुंबई प्रदूषण, खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

उच्च न्यायालयाचा निर्वाळा; दोनपेक्षा जास्त मुले असलेली व्यक्ती गृहनिर्माण संस्थेचा समिती सदस्य म्हणून अपात्र

Next Post
उच्च न्यायालय वांद्रे ऐवजी गोरेगावला स्थलांतरित होण्याची शक्यता

उच्च न्यायालयाचा निर्वाळा; दोनपेक्षा जास्त मुले असलेली व्यक्ती गृहनिर्माण संस्थेचा समिती सदस्य म्हणून अपात्र

BreakingNews

‘म्हातारीचा बूट’ झळकणार नव्या रूपात; दुरुस्तीसाठी महापालिकेचे ७.५ लाखांचे पाऊल!

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.