ठाणे : ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक, क्राईम ब्रांचचे दहा पथक व स्थानिक पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईमध्ये हस्तगत केलेला तब्बल १ हजार ५६ किलो वजनाचा ड्रग्ज साठा तळोजा एमआयडीसी येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीच्या बंदिस्त भट्टीमध्ये हे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. नष्ट करण्यात आलेल्या ड्रग्ज साठ्यात गांजा, चरस, एमडी, चरस ऑइल, कोकेन, ब्राऊनशुगर, मेथेडॉन, केटामाईन, एलएसडी पेपर, मेथेक्यूलीन आणि कोडीनयुक्त कफ सिरपच्या २६ हजार ९३५ बॉटल्सचा समावेश आहे. नष्ट करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत तब्बल १४३ कोटी ५३ लाख ८१ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठाणे पोलिसांच्या वतीने ऑपरेशन ऑलआउट मोहीम राबविण्यात येऊन ड्रग्ज तस्कर, विक्रेते तसेच सेवन करणारे यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. हा जप्त केलेला ड्रग्ज साठा नष्ट करण्यासाठी न्यायालयाच्या परवानगीने तसेच भारत सरकारच्या आदेशानुसार मुद्देमाल नाश समिती स्थापन करण्यात आली आहे.
ठाण्यात देखील ही समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष ठाणे गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त आहेत. या समिती सदस्यांच्या तसेच ज्ञानवैज्ञानिक प्रगोगशाळा कलिना मुंबई येथील रासायनिक विश्लेषक, ठाणे महानगर पालिकेचे अधिकारी यांच्या उपस्थितीत हा ड्रग्जसाठा नष्ट करण्यात आला. ठाणे पोलीस आयुक्तालयातील पाच परिमंडळात अंमली पदार्थ संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल नाश करण्याबाबत कायदेशिर बाबींची पुर्तता पुर्ण झालेल्या व समितीने मान्यता दिलेल्या १६३ गुन्ह्यातील मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. तसेच अंमली पदार्थ मुद्देमाल नाश करण्या करिता प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून ड्रग्ज नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली. ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) तथा मुद्देमाल समिती अध्यक्ष डॉ.पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली मुद्देमाल नाश समितीचे सदस्य यांनी ही कारवाई केली.ठाणे : ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक, क्राईम ब्रांचचे दहा पथक व स्थानिक पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईमध्ये हस्तगत केलेला तब्बल १ हजार ५६ किलो वजनाचा ड्रग्ज साठा तळोजा एमआयडीसी येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीच्या बंदिस्त भट्टीमध्ये हे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. नष्ट करण्यात आलेल्या ड्रग्ज साठ्यात गांजा, चरस, एमडी, चरस ऑइल, कोकेन, ब्राऊनशुगर, मेथेडॉन, केटामाईन, एलएसडी पेपर, मेथेक्यूलीन आणि कोडीनयुक्त कफ सिरपच्या २६ हजार ९३५ बॉटल्सचा समावेश आहे. नष्ट करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत तब्बल १४३ कोटी ५३ लाख ८१ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठाणे पोलिसांच्या वतीने ऑपरेशन ऑलआउट मोहीम राबविण्यात येऊन ड्रग्ज तस्कर, विक्रेते तसेच सेवन करणारे यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. हा जप्त केलेला ड्रग्ज साठा नष्ट करण्यासाठी न्यायालयाच्या परवानगीने तसेच भारत सरकारच्या आदेशानुसार मुद्देमाल नाश समिती स्थापन करण्यात आली आहे. ठाण्यात देखील ही समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष ठाणे गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त आहेत. या समिती सदस्यांच्या तसेच ज्ञानवैज्ञानिक प्रगोगशाळा कलिना मुंबई येथील रासायनिक विश्लेषक, ठाणे महानगर पालिकेचे अधिकारी यांच्या उपस्थितीत हा ड्रग्जसाठा नष्ट करण्यात आला. ठाणे पोलीस आयुक्तालयातील पाच परिमंडळात अंमली पदार्थ संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल नाश करण्याबाबत कायदेशिर बाबींची पुर्तता पुर्ण झालेल्या व समितीने मान्यता दिलेल्या १६३ गुन्ह्यातील मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. तसेच अंमली पदार्थ मुद्देमाल नाश करण्या करिता प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून ड्रग्ज नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली. ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) तथा मुद्देमाल समिती अध्यक्ष डॉ.पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली मुद्देमाल नाश समितीचे सदस्य यांनी ही कारवाई केली.