मुंबई : ५६व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील समितीने मुलभूत कर रचनेनमध्ये मोठे बदल केले आहेत. आता जीएसटीचे केवळ ५ टक्के आणि १८ टक्के असे दोन स्लॅब असतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे लक्झरी गोष्टींवरील कर ४० टक्क्यांपर्यंत निश्चित करण्याचा प्रस्ताव मांडण्याबरोबरच आतापर्यंत भरपूर कर आकरल्या जात असलेल्या अनेक गोष्टींवरील कर थेट शून्य करण्यात आला आहे.
- अल्ट्रा हाय ट्रेम्पेचर मिल्कवरील कर माफ करण्यात आला आहे.
- याशिवाय चपाती, खाकरा, रोटी, पिझ्झा ब्रेडवरील करही शून्य करण्यात आला आहे.
- अनेक औषधं करमुक्त करण्यात आली आहेत. यामध्ये ३३ अशी औषधं आहेत जीवनावशक्य ठरतात.
- प्रीपॅक्ड पनीरवरील कर पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
- पेन्सिल, शार्पनर, रंगीत खडू, रंगांवरील कर हा १२ टक्क्यांवरुन शून्य टक्के करण्यात आला आहे.
- नकाशे, शैक्षणिक तक्ते, पृथ्वीगोल यासारख्या अभ्यासासाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टींवर कर 12 टक्क्यांवरुन शून्य करण्यात आला आहे.
- सराव पुस्तिका, वह्यांवरील कर हा १२ टक्क्यांवरुन कमी करुन अगदी शून्य करण्यात आला आहे.
- खोडरबरवर आकराला जाणारा ५ टक्के कर रद्द करण्यात आला आहे.
वरील सर्व गोष्टी परवडणारं शैक्षणिक धोरणाअंतर्गत करमुक्त करण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. मात्र या शैक्षणिक वस्तूंबरोबरच सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आणि काही महिन्यांपूर्वी वादाचा विषय ठरलेल्या एका महत्त्वाच्या गोष्टीवरील कर पूर्णपणे रद्द करत मोठा दिलासा देण्यात आला आहे. ज्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल आपण बोलतोय ती गोष्ट आहे विमा! वैयक्तिक आरोग्य विमा आणि लाइफ इन्शूरन्सवरील १८ टक्के कर कमी करुन तो अगदी शून्य करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आता विमा काढणं सहज शक्य होणार आहे.