Lokrakshanay
Wednesday, May 13, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड वितरणाला वेग; जादा शुल्क घेणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 6, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड वितरणाला वेग; जादा शुल्क घेणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) सवलतधारक प्रवाशांसाठी NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड वितरण मोहिमेला वेग दिला असून राज्यभरात ३००० हून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक एसटी आगार तसेच प्रमुख बसस्थानकांवर ही स्मार्ट कार्डे उपलब्ध करून देण्यात येत असून, प्रवाशांना अधिक सुलभ आणि डिजिटल सुविधा देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. नवीन NCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी १९९ रुपये, तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी १४९ रुपये असा अधिकृत दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी एसटी महामंडळाकडे प्राप्त झाल्यानंतर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कठोर भूमिका घेतली आहे. जादा दर आकारणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला असून काही विक्रेत्यांवर कारवाईही करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

एसटी महामंडळाने सवलतींचे वितरण अधिक पारदर्शक, अचूक आणि डिजिटल पद्धतीने करण्यासाठी NCMC कार्ड प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असून पुढील टप्प्यात इतर सवलतधारक प्रवाशांचाही या योजनेत समावेश केला जाणार आहे. महामंडळाच्या नियोजनानुसार, भविष्यात सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी प्रवासादरम्यान NCMC कार्ड वापरणे अनिवार्य करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना तिकीट वितरण, कार्ड टॉप-अप आणि इतर व्यवहार अधिक जलद व सुलभ पद्धतीने करता येणार असून सवलतींचा लाभ थेट आणि पारदर्शक प्रणालीद्वारे मिळणार आहे. या संदर्भात महामंडळाने एकसंध मानक कार्यपद्धती (SOP) निश्चित केली असून सर्व आगार व्यवस्थापकांना तिची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे एसटी सेवा अधिक आधुनिक, प्रवासी-केंद्रित आणि तंत्रज्ञानाधारित बनण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेल्याचे प्रताप सरनाईक यांनी नमूद केले.

Previous Post

‘म्हातारीचा बूट’ झळकणार नव्या रूपात; दुरुस्तीसाठी महापालिकेचे ७.५ लाखांचे पाऊल!

Next Post

अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू

Next Post
अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू

अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.