Lokrakshanay
Sunday, May 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

सोलापूर हादरले, सावत्र आईने केली ३ वर्षाच्या चिमुकलीची हत्या

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 2, 2025
in Uncategorized, गुन्हेगारी
सोलापूर हादरले, सावत्र आईने केली ३ वर्षाच्या चिमुकलीची हत्या
Share on FacebookShare on Whatsapp

सोलापूर : सोलापूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून सावत्र आईने ३ वर्षाच्या चिमुकलीचा गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे उघडकीस आली आहे. मुलीचा छळ आणि तिच्या मृत्यूमागील क्रूरता समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागेश कोकणे हे आपल्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या पत्नी तेजस्विनी हिच्यासह वडवळ स्टॉप येथे भाड्याने राहतात. त्याच्यासोबत पहिल्या पत्नीपासून झालेल्या दोन मुली कीर्ती आणि आकृतीही राहत होत्या. गेल्या काही महिन्यांपासून नागेशची दुसरी पत्नी तेजस्विनी या दोन्ही मुलींवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार करत होती. ती मुलींना क्षुल्लक कारणावरून मारहाण करत असल्याचे शेजारच्यांनी सांगितले होते. शुक्रवारी सकाळी कीर्तीने नाश्ता करण्यास नकार दिला त्यामुळे तेजस्विनी संतप्त झाली. तिला अमानुषपणे मारहाण केली. आणि नंतर गळा दाबून तिची हत्या केली. घटनेनंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.ही संतापजनक घटना शुक्रवारी (१ ऑगस्ट) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. मृत मुलीचे नाव कीर्ती नागेश कोकणे (वय ३) असे असून, तिची सावत्र आई तेजस्विनी नागेश कोकणे (वय ३३) हिनेच तिचा जीव घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी अश्विनी सतीश घोलप यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तेजस्विनी कोकणे हिच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातील इतर सदस्यांचीही चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आरोपी तेजस्विनीला अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous Post

नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेची ६० लाखांची फसवणूक

Next Post

सीमाशुल्क अधीक्षकाला केली सीबीआयने १० लाखांची लाच घेताना अटक

Next Post
सीमाशुल्क अधीक्षकाला केली सीबीआयने १० लाखांची लाच घेताना अटक

सीमाशुल्क अधीक्षकाला केली सीबीआयने १० लाखांची लाच घेताना अटक

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.