Lokrakshanay
Sunday, April 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वेमार्गावरील झोपडीधारकांवर टांगती तलवार, ३१०० झोपड्यांना हटावाची नोटिस

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 9, 2026
in ताज्या बातम्या, मुंबई
कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वेमार्गावरील झोपडीधारकांवर टांगती तलवार, ३१०० झोपड्यांना हटावाची नोटिस
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मध्य रेल्वेने कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गालगतच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांना नोटीस बजावली आहे. तसेच १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. यामुळे रुळांजवळ राहणाऱ्या रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. २७ जानेवारी रोजी जारी केलेल्या या नोटिसांमध्ये कुर्ला-ट्रॉम्बे या एकेरी मालवाहतूक मार्गालगत असलेल्या ३ हजार १५४ झोपड्यांचा समावेश आहे. हा मार्ग केवळ मालवाहतुकीसाठी वापरला जातो. या मार्गावरुन अत्यंत ज्वलनशील, स्फोटक आणि धोकादायक पदार्थ वाहून नेणाऱ्या गाड्या धावतात.

गैस द्रवरूप पेट्रोलियम (एलपीजी), कच्चे तेल, पेट्रोलियम उत्पादने आणि रसायनासारख्या वस्तूंची वाहतूक नियमितपणे या मार्गावरून तेल शुद्धीकरण कारखाने आणि ऊर्जा प्रकल्पासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवरून केली जाते. रुळांच्या जवळ असलेल्या झोपड्यांमुळे दाट लोकवस्तीच्या भागात मोठ्या आपत्तीचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. रेल्वेच्या आकडेवारीनुसार, कुर्ला-ट्रॉम्बे पट्टा ही मुंबईच्या उपनगरीय रेल्वे जाळ्यातील मोठ्या अतिक्रमण समस्येचा एक भाग आहे. मध्य रेल्वेच्या ३७.२९ हेक्टर रेल्वे जमिनीवर १३ हजार ८३९ बेकायदेशीर बांधकामे पसरलेली आहेत. कुर्ला, मानखुर्द आणि कुर्ला-ट्रॉम्बे मार्गावर सर्वाधिक अतिक्रमण आहे. पश्चिम रेल्वेवर, अनधिकृत बांधकामांची संख्या १० हजार ५७२ आहे. वांद्रे-खार पट्टचात सर्वाधिक अतिक्रमणे आहेत. रेल्वेच्या आकडेवारीनुसार, कुर्ला-ट्रॉम्बे पट्टा ही मुंबईच्या उपनगरीय रेल्वे जाळ्यातील मोठ्या अतिक्रमण समस्येचा एक भाग आहे. अतिक्रमणांमुळे रेल्वेच्या नियोजन आणि कामकाजाचा विस्तार करण्याच्या क्षमतेवर मर्यादा येतात. अतिक्रमण हटवण्यासाठी रेल्वे अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे.

Previous Post

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ‘सप्तरंग महोत्सव २०२६’ साजरा

Next Post

रेल्वे अपघात रोखण्यासाठी सरकारचा मास्टरप्लान!

Next Post
रेल्वे अपघात रोखण्यासाठी सरकारचा मास्टरप्लान!

रेल्वे अपघात रोखण्यासाठी सरकारचा मास्टरप्लान!

BreakingNews

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.