Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

देशभरात दहशत माजवणाऱ्या सलमानला पकडलं फिल्मी स्टाईलने, नातेवाईकांचा पोलिसांवर हल्ला

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 7, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
देशभरात दहशत माजवणाऱ्या सलमानला पकडलं फिल्मी स्टाईलने, नातेवाईकांचा पोलिसांवर हल्ला
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : संपूर्ण देशभरात लूटमार करून दहशत माजवणाऱ्या सलमान जाफरी उर्फ सलमान इराणी या सराईत चोरट्याला कल्याणच्या आंबिवलीतील इराणी वस्तीतून फिल्मी स्टाईलने अटक करण्यात आली आहे. पनवेल शहर पोलिसांना हवा असलेल्या या आरोपीला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांच्या मदतीने जेरबंद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, आरोपीला पकडण्याचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यावेळी सलमानच्या नातेवाईकांनी पोलिसांवर हल्ला करून त्याला सोडवण्याचा प्रयत्नही केला. पण पोलिसांनी मोठ्या शिताफीने या चोरट्याला जेरबंद केले आहे. पनवेलमध्ये सोनसाखळी चोरीची घटना घडली होती. सोनसाखळी चोरीच्या घटनेनंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तपासाला सुरूवात केली.

पोलिसांनी तपास करून आरोपीची ओळख पटवली. सलमान इराणी असे आरोपीचे नाव असून, तो आंबिवली येथील इराणी वस्तीत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पनवेल शहर पोलिसांनी तात्काळ खडकपाडा पोलिसांशी संपर्क साधला. खडकपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी विजय गायकवाड यांचे पथक आणि पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पथक संयुक्तपणे सलमानला पकडण्यासाठी आंबिवलीतील इराणी वस्तीत दाखल झाले. पोलिसांना सलमान इराणी वस्तीत दिसला. पोलिसांनी आधी त्याला न पाहिल्याचे भासवत अचानक त्याच्यावर झडप घातली. सलमानने पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा जोरदार प्रयत्न केला. याच वेळी सलमानचे नातेवाईक तिथे जमले आणि त्यांनी सलमानला सोडवण्यासाठी पोलिसांशी झटापट सुरू केली. मात्र, पोलिसांनी सलमानच्या मुसक्या आवळल्या. या घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी सलमानला ताब्यात घेतले असून, पुढील कारवाईसाठी पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या इराणी वस्तीत पोलीस पथकांवर यापूर्वीही अनेकदा हल्ले झाले आहे. तरीही पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावत अनेक चोरट्यांना जेरबंद केले आहे.

Previous Post

नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईसह पुणेकरांची सोय, विमानतळाची ‘ही’ १० वैशिष्ट्ये

Next Post

मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूची बहीण ‘बिग बॉस’च्या घरात

Next Post
मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूची बहीण ‘बिग बॉस’च्या घरात

मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूची बहीण ‘बिग बॉस’च्या घरात

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.