Lokrakshanay
Sunday, March 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

वाशी बस स्टॉपवर दरोडा : नवी मुंबईतील प्रवाशांचा फोन भामट्यांनी हिसकावला – १२ हजार रुपये ही लुटले

हे प्रकार आता वल्लीपीर रस्त्यावरील वाशी बस थांब्यावर सुरू झाल्याने प्रवाशांनी विशेषता महिला प्रवाशांनी धसका घेतला आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात दिवसेंदिवस भुरट्या चोऱ्या वाढत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 13, 2024
in गुन्हेगारी, ठाणे, ताज्या बातम्या
मद्यधुंद चालकाने वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करून केली मारहाण
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण: कल्याण पश्चिमेतील वल्लीपीर रस्त्यावरील वाशी बस थांबा येथे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नवी मुंबई मधील एक प्रवासी आणि त्याचे दोन मित्र वाशी बसमध्ये चढत होते. यावेळी तीन भामट्यांनी बसमध्ये चढत असताना हुल्लडबाजी करून एका प्रवाशा बरोबर वाद घालून त्याच्या जवळील १२ हजार रूपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळून गेले. आतापर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या कल्याण पश्चिमेतील बस आगारात प्रवाशांजवळील वस्तू चोरणे, आगारा बाहेरील प्रवाशांच्या हातामधील वस्तू लुटून नेण्याचे प्रकार घडत होते. हे प्रकार आता वल्लीपीर रस्त्यावरील वाशी बस थांब्यावर सुरू झाल्याने प्रवाशांनी विशेषता महिला प्रवाशांनी धसका घेतला आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात दिवसेंदिवस भुरट्या चोऱ्या वाढत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पोलिसांनी सांगितले, हेतराज प्रजापती (२२) हे कल्याणमध्ये नोकरी करतात. ते नवी मुंबईतील सानपाडा भागात राहतात. रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान तक्रारदार हेतराज आणि त्यांचे दोन साथीदार वल्लीपीर रस्त्यावरील वाशी बस थांब्यावरील नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या वाशी बसमध्ये चढत होते. बसमध्ये चढत असताना तीन भामट्यांनी हेतराज यांच्याशी बसमध्ये चढताना धक्काबुक्की का केली, असे बोलत भांडण उकरून काढले. तिघे मिळून हेतराज यांना दमदाटी करू लागले. हेतराज त्यांना समंजसपणे सांगत असताना, ते दादागिरीची भाषा करत होते. तिन्ही भामटे चोरी, प्रवाशाला लुटण्याच्या उद्देशाने बसमध्ये चढले होते. हेतराज यांच्याशी बाचाबाची केल्यानंतर एका भामट्याने हेतराज यांच्या हातामधील मोबाईल हिसकावला. तो परत देण्याची मागणी हेतराज करू लागले तेव्हा ते तिघे भामटे बसमधून उतरून पळून गेले. हेतराज यांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. हवालदार पी. एल. साळुंखे तपास करत आहेत.

Previous Post

मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे ते ठाणे वाहतूक कोंडीच्या समस्येतून, मे २०२५ मध्ये सुटका होणार

Next Post

बसेरा झोपु योजनेचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले

Next Post
बसेरा झोपु योजनेचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले

बसेरा झोपु योजनेचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले

BreakingNews

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे ही काळाची गरज – डॉ. राम पुनियानी

युद्धभूमीतून प्रवास यशस्वी! होर्मुझ सामुद्रधुनी पार करून पहिले तेलवाहू जहाज मुंबईत दाखल

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.