Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

सामाजिक व जातीय समीकरणांचा विचार करत राज्यातील १४ आयटीआयचे नामांतर

कौशल्य विकास मंत्रालयाचा मोठा निर्णय

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 23, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
सामाजिक व जातीय समीकरणांचा विचार करत राज्यातील १४ आयटीआयचे नामांतर
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे प्रतिनिधी  : आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठीक राज्यातील काही आयटीआयचे नामकरण करण्यात आले आहे. या आयटीआयना दि.बा पाटील, बाबासाहेब आंबेडकर, आनंद दिघे, विनायक मेटे यांच नावे देण्यात आली आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हा महत्वाचा निर्णय जाहीर केलाय. आयटीआयला नाव देताना सामाजिक व जातीय समीकरणांचा विचार करण्यात आल्याचे ते म्हणाले. ठाण्यातील आयटीआयला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात आले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर शिकलेल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातील आयटीआयला बाबासाहेबांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कोल्हापूरच्या आयटीआयला शाहू महाराजांचे आणि बीडच्या आयटीआयला विनायक मेटेंचे नाव देण्यात आले आहे.
कौशल्य विकास विभागाच्या अखत्यारितील पुढील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नावांमध्ये बदल करण्यात येत आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई -1, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि. अहमदनगर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड, जि. बीड, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार, जि. पालघर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, जि. नाशिक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव यांचा समावेश आहे.
नव्याने करावयाचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामकरण पुढीलप्रमाणे असेल. १)धर्मवीर आनंद दिघे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे. २)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई, ३)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि. अहमदनगर, ४)कै. विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड, जि.बीड, ५)भगवान बिरसा मुंडा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार, जि. पालघर, ६)महात्मा ज्योतिबा फुले औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, नाशिक, ७)राजर्षी शाहू महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर, ८)संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती, ९)लोकशाहीर आण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली, १०)कवयत्री बहिणाबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव, ११) दत्तोपंतजी ठेंगडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा, १२)दि. बा. पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई, १३)महाराणा प्रताप औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई, १४)आचार्य विदयासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव असे नामकरण करण्यात आले आहे.

Previous Post

राष्ट्रीय ‘पोषण माह’ राबविण्यात देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक – आयुक्त (अंगणवाडी) कैलास पगारे

Next Post

न्यायदानाची बदललेली संकल्पना म्हणजे “न्याय आपल्या दारी” – सरन्यायाधीश डॉ.धनंजय वाय चंद्रचूड

Next Post
न्यायदानाची बदललेली संकल्पना म्हणजे “न्याय आपल्या दारी” – सरन्यायाधीश डॉ.धनंजय वाय चंद्रचूड

न्यायदानाची बदललेली संकल्पना म्हणजे "न्याय आपल्या दारी" - सरन्यायाधीश डॉ.धनंजय वाय चंद्रचूड

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.