Lokrakshanay
Thursday, January 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाण्यातील रखडलेल्या इमारत पुनर्विकास प्रकल्पांची कामे लवकरच सुरू होणार

ठाण्यातील बांधकाम क्षेत्रात मे. जोशी एन्टरप्रायझेस कंपनी प्रसिद्ध आहे. या कंपनीतील भागीदारांमध्ये अंतर्गत वाद झाला होता आणि हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता. या वादामुळे कंपनीने हाती घेतलेले बांधकाम प्रकल्प रखडल्याने तेथील रहिवाशी हवालदिल झाले होते.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 20, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाण्यातील रखडलेल्या इमारत पुनर्विकास प्रकल्पांची कामे लवकरच सुरू होणार
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाण्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध मे. जोशी एन्टरप्रायझेस कंपनीच्या भागीदारांमधील अंतर्गत कलहातून जुन्या ठाण्यातील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांची कामे लवकरच सुरू होणार असून रहिवाशांनी एकत्रित येऊन केलेल्या संघर्षानंतर कंपनीतील एका भागीदाराने पुढे येऊन या प्रकल्पाची कामे पूर्ण करण्याची तयारी दाखविली आहे. तसेच त्याने थकीत घर भाड्याचे धनादेश दिले असून त्याचे वाटप या लढ्यात रहिवाशांना साथ देणारे भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

ठाण्यातील बांधकाम क्षेत्रात मे. जोशी एन्टरप्रायझेस कंपनी प्रसिद्ध आहे. या कंपनीतील भागीदारांमध्ये अंतर्गत वाद झाला होता आणि हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता. या वादामुळे कंपनीने हाती घेतलेले बांधकाम प्रकल्प रखडल्याने तेथील रहिवाशी हवालदिल झाले होते. या कंपनीने जुन्या ठाण्यामध्ये एकूण १६ मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांसोबत इमारत पुनर्विकासाचे करार केले होते. त्यापैकी चार इमारतींमधील रहिवाशांनी घरे रिकामी केली होती. या जुन्या इमारतीचे बांधकाम कंपनीने पाडले होते. त्यापैकी काहींना घरभाडे मिळत नव्हते. या रहिवाशांची कंपनीकडून फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले असून याप्रकरणी रहिवाशांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात काही भागीदारांना पोलिसांनी अटक केली होती. हे प्रकरण ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. या प्रकल्पातील रहिवाशांनी एकत्रित येऊन लढा उभारला होता. थकीत घर भाडे मिळावे आणि रखडलेल्या प्रकल्पांची कामे कशी मार्गी लागतील, यासाठी रहिवाशी बैठका घेत होते. या रहिवाशांनी भेट घेतल्यानंतर भाजपचे आमदार संजय केळकर याप्रकरणाचा शासन – प्रशासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला होता. या लढ्याला आता यश मिळल्याने रखडलेल्या प्रकल्पाची कामे लवकरच सुरू होणार आहेत.

ठाण्यातील मे.जोशी एन्टरप्रायजेस या कंपनीच्या भागिदारामधील अंतर्गत वादामुळे नौपाडा परिसरातील नवसोनाली, सहजीवन, नोबल, दर्शनी, सुजाता, रचना, अनामिका, नूतन आदी को-ऑप. सोसायट्यांचा पुर्नविकास रखडला होता. रहिवाशांचा लढा आणि आमदार केळकर यांनी शासन – प्रशासन स्तरावर पाठपुरावा केल्यामुळे मे. जोशी बिल्डर्सचे भागीदार डि.के. सिंग यांनी प्रकल्पाची कामे पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले आहे. कंपनीच्या कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण करून रहिवाशांसोबत नवे करार केले जाणार आहेत. दरम्यान, बिल्डरने थकीत घर भाड्याचे धनादेश दिले असून त्याचे वाटप आमदार केळकर यांच्या हस्ते रहिवाशांना करण्यात आले. याकामात ॲड. सुभाष काळे आणि विद्याधर वैशंपायन यांचेही सहकार्य लाभले. या धनादेश वाटपप्रसंगी शेकडोच्या संख्येने रहिवाशी उपस्थित होते, तर व्यासपीठावर माजी नगरसेवक सुनेश जोशी, वास्तुविशारद संदीप प्रभु हे उपस्थित होते.

विकासकालाही अडचणी उद्भवू शकतात, परंतु रहिवाशी हा केंद्रबिंदू मानून विकासक आणि संबंधित यंत्रणांनी काम करणे गरजेचे आहे. ज्यांच्याशी संघर्ष होता, त्यांनाच सोबत घेऊन समन्वयाच्या माध्यमातून एकत्रित लढा दिल्यानेच हे यश लाभले असून प्रत्येक रहिवाशी स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये जाईपर्यंत पाठीशी राहीन. पुर्नविकास रखडलेल्या ठाण्यातील सोसायट्यांसाठी हा एकप्रकारे रोडमॅप ठरेल. तसेच ठाणे शहरामध्ये अनेक मोठे प्रकल्प रखडलेले असून जवळपास ४ ते ५ हजार रहिवाशी त्रस्त आहेत. या रहिवाश्यांचे हक्क अबाधित राहायला हवेत. ठराविक मुदतीत पूर्ण न होता गृहप्रकल्प रखडले असतील तर असे प्रकल्प रद्द करून इतर विकासकाकडे हस्तांतरीत करण्याची तरतूद हवी, अशी मागणी शासनाकडे केली आहे. – संजय केळकर, आमदार, ठाणे शहर

Previous Post

धरणात मागील काही दिवसांपासून दमदार पाऊस, १६२६ मिमी पावसाची नोंद; मोरबे धरण ५१ टक्के भरले

Next Post

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे कल्याणची लोकल सेवा विस्कळीत, कामाच्या पहिल्या दिवशीच प्रवासी संतप्त

Next Post
सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे कल्याणची लोकल सेवा विस्कळीत, कामाच्या पहिल्या दिवशीच प्रवासी संतप्त

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे कल्याणची लोकल सेवा विस्कळीत, कामाच्या पहिल्या दिवशीच प्रवासी संतप्त

BreakingNews

राज्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर राहणार ड्रोन कॅमेऱ्याची नजर!

उल्हासनगरमध्ये खळबळ : ५० लाखांची रोकड जप्त!

मताधिकार मोबाईल ॲप : मतदारांना घरबसल्या शोधता येणार यादीतील नाव आणि मतदान केंद्र!

आता एका सिगारेटसाठी मोजावे लागणार ७२ रुपये?

कल्याण हादरले! २१ वर्षीय एअर होस्टेस तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

अमेरिकेला भारतीय कोळंबीची चटक! शुल्कात वाढ केल्यानंतरही निर्यातीत वाढ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.