Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पुण्यातील बहीण-भावाला भाऊबीजेच्या दिवशी अग्निशमन दलाने दिले जीवदान

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 4, 2024
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
पुण्यातील बहीण-भावाला भाऊबीजेच्या दिवशी अग्निशमन दलाने दिले जीवदान
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : पुण्यात रविवारी सर्वत्र भाऊबीजेचा सण साजरा होत असतांना एक धक्कादायक घटना घडली. नैराश्यात असलेल्या भाऊ आणि बहिणीने आईला व्हिडीओ कॉल करत आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. यानंतर घरात स्वत:ला कोंडून घेत विष प्राशन केलं. या घटनेची माहिती आईने पोलिसांना दिली. पोलिसांनी अग्निशामक दलाला ही माहिती दिल्यावर अग्निशामक दलाच्या पथकाने तातडीने घरी जाऊन घराचा दरवाजा तोडून या बहीण भावाचे प्राण वाचवले. त्यांना रुबि हॉल येथे अॅडमिट करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

पुण्यात रविवारी भाऊबीज साजरी करण्यात आली. सर्व जण हा सण साजरा करत असतांना वानवडी येथील विकास नगरातील कृष्ण कन्हैया सोसायटीत दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेत राहणाऱ्या भाऊ व बहिणीने टोकाचे पाऊल उचललं. त्यांनी आईला व्हिडिओ कॉल केला. यावेळी ते नैराश्यात असल्याने जीवन संपवत असल्याचं त्यांनी त्यांच्या आईला संगीतलं. या घटनेमुळे आई घाबरली. तिने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी देखील या घटनेची गंभीरतेने दखल घेत तातडीने अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. रात्री १०.३० वाजता अग्निशामक दलाला याची माहिती मिळाली. बीटी कवडे रस्ता व कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशामक दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. यावेळी दोघांनी फ्लॅटचा दरवाजा यातून बंद केला असल्याचे आढळले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जवानांनी तातडीने विलंब न करता डोअर ब्रेकर, कटावणी, पहार यांच्या साह्याने सुमारे दहा मिनिटातच फ्लॅटचा दरवाजा तोडला व अंत मध्ये प्रवेश केला. यावेळी १९ वर्षीय भाऊ व २४ वर्षीय बहीण ही बेशुद्ध असल्याचं आढळलं. जवानांनी तातडीने अग्निशमन दलाच्या वाहनातूनच त्यांना जवळच असलेल्या रुबि हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर तातडीने उपचार झाल्याने दोघांचेही प्राण वाचले आहे. हे दोघेही लवकरच बरे होतील असे डॉक्टरांनी सांगितले. दिवाळी सणात भाऊबीजेच्या दिवशी उचित वेळेत केलेली कामगिरी भाऊ व बहिणेचे प्राण अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांमुळे वाचू शकले. कुटुंबीयांनी या सर्वांचे आभार मानले आहे.

 

Previous Post

मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार

Next Post

साताराजिल्ह्यात भाजपला खासदारकीच्या नात्याने जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी उदयनराजे यांची धडपड सुरु

Next Post
साताराजिल्ह्यात भाजपला खासदारकीच्या नात्याने जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी उदयनराजे यांची धडपड सुरु

साताराजिल्ह्यात भाजपला खासदारकीच्या नात्याने जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी उदयनराजे यांची धडपड सुरु

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.