Lokrakshanay
Sunday, April 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींच्या विक्रीवर कल्याण-डोंबिवलीत बंदी

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत यंदाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्ती उत्पादन, विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाने घेतला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 14, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींच्या विक्रीवर कल्याण-डोंबिवलीत बंदी
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत यंदाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्ती उत्पादन, विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाने घेतला आहे. मूर्तिकारांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती उत्पादनावर भर द्यावा आणि भाविकांनी अशा मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पालिका हद्दीत गणेश मूर्तींचे उत्पादन, विक्री करण्यासाठी मूर्तिकार, कारागिर, विक्रेत्यांनी पालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. जे मूर्तिकार, विक्रेते, कारागिर पालिकेकडे नोंदणी करणार नाहीत, त्यांना पालिका हद्दीत मूर्ती विकण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही, असे कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मे २०२० च्या सुधारित नवीन मार्गदर्शक कायद्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती उत्पादनांवर बंदी घातली आहे. त्याचे काटेकोर पालन कल्याण डोंबिवली पालिकेकडून केले जाणार आहे. मूर्तिकार, उत्पादक, कारागिर, विक्रेते यांना मूर्ती तयार करण्याचा कारखाना सुरू करणे, मूर्ती विक्रीसाठी मंच लावणे यासाठी परवानगी देण्यासाठी पालिका प्रभाग कार्यालयांमध्ये नियोजन केले जाणार आहे. जे अशाप्रकारची परवानगी घेणार नाहीत, त्यांच्यावर पालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी कारवाई करतील, असे आयुक्त डॉ. जाखड यांनी स्पष्ट केले आहे. पालिका परवानगीची प्रत प्रत्येक मूर्तिकार, कलाकार, विक्रेत्यांनी कारखाना, दुकानाच्या दर्शनी भागात लावावी. पर्यावरणपूरक, शाडू मातीच्या, नैसर्गिक रंग वापरून सहज पाण्यात विरघळणाऱ्या मूर्ती तयार करण्यावर मूर्तिकारांना भर द्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. जे या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिला आहे.

Previous Post

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आपदग्रस्तांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – मंत्री अनिल पाटील

Next Post

जाहिरात फलकाची पाहणी करून कारवाईसाठी मुंबई महापालिका परवाना विभागाकडून पथके स्थापन

Next Post
कृत्रिम पावसासाठी पालिका आता निविदा मागवणार; पाच देशी कंपन्या स्पर्धेत

जाहिरात फलकाची पाहणी करून कारवाईसाठी मुंबई महापालिका परवाना विभागाकडून पथके स्थापन

BreakingNews

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.