Lokrakshanay
Sunday, April 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

कारखाली चिरडल्याबद्दल 50 हजार दंड; आणि एक महिना कारावास

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 11, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
कारखाली चिरडल्याबद्दल 50 हजार दंड; आणि एक महिना कारावास
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भरधाव वाहन चालवत एका पादचाऱ्यास उडवून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मोटार चालकास ठाणेन्यायालयाने एक महिन्याचा साधा कारावास व ५० हजार रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, दंड न भरल्यास आणखी १० दिवसांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. तत्कालीन काशिमीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सह्याद्री हॉटेलसमोर २८ मे २०२१ रोजी हा अपघात घडला होता. कांदिवलीच्या शंकर लेनवरील पंकज कमल इमारतीत राहणारे मनीष रमेश शाह (वय ५२) हे त्यांच्या मोटारीने दुपारी चालले होते. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव मोटार चालवून मनीष शाह याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका पादचाऱ्यास उडवले. सुमारे ३० वर्षांच्या त्या अनोळखी पादचाऱ्याचा मोटारीच्या जबर धडकेत मृत्यू झाला. शाह याने अपघातानंतर जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी नेण्याची जबाबदारी टाळून पळून गेला होता. २८ मे रोजी सायंकाळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ९ जून रोजी मनीष शाह याला पोलिसांनी अटक केली. काशिमीरा पोलिस ठाण्याचे तत्कालीन तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन पोतदार यांनी तपास केला होता. तर, विद्यमान वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट कारकून हवालदार आर. एन. गायकवाड यांनी न्यायालयात पैरवी केली. सहायक सरकारी अभियोक्ता किरण वेखंडे यांनी पोलिसांच्या वतीने बाजू मांडली. दंडाची रक्कम न भरल्यास १० दिवस कैद या गुन्ह्यात फिर्यादी, पंच, इतर साक्षीदार यांच्या साक्षीवरून तसेच तपास अधिकारी यांच्या तपासावरून मनीष शाहविरुद्ध पुरावा सिद्ध झाल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो. आर. आर. भगत यांनी आरोपी शाह याला एक महिना साधा कारावास व ५० हजार रुपये दंड आणि दंडाची रक्कम न भरल्यास १० दिवस कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

Previous Post

२०० रुपये दिले नाही खर्चासाथी; म्हणून हत्या करणाऱ्यास जन्मठेप

Next Post

मगरीची तस्करी करणाऱ्या आरोपीवर वनविभागाची कारवाई

Next Post
मगरीची तस्करी करणाऱ्या आरोपीवर वनविभागाची कारवाई

मगरीची तस्करी करणाऱ्या आरोपीवर वनविभागाची कारवाई

BreakingNews

कॉलेजमधील ‘ती’ भेट अन् १५ वर्षांचा विरह; ईशा-अभिषेकच्या फिल्मी लव्हस्टोरीचा गोड शेवट!

जिल्ह्यातील तरुणाईला बजेटचे धडे! ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

शाळेतच भरली ‘विद्यार्थी बँक’! महापालिकेच्या उपक्रमातून चिमुरडे गिरवतायत बचतीचे धडे

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

राज्यात आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.