Lokrakshanay
Wednesday, April 8, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पुन्हा एकदा साडे माडे तीन : नव्या वर्षात येणार प्रेक्षकांच्या भेटीस! रिलीज डेट जाहीर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 26, 2025
in ताज्या बातम्या, मनोरंजन
पुन्हा एकदा साडे माडे तीन : नव्या वर्षात येणार प्रेक्षकांच्या भेटीस! रिलीज डेट जाहीर
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : नाताळ म्हणजे आनंद, भेटवस्तू आणि हसू… आणि याच नाताळच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त हास्याची भेट समोर आली आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ‘कुरळे ब्रदर्स’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर झळकणार असून, हा चित्रपट येत्या ३० जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टर पाहाताच एक गोष्ट स्पष्ट होत आहे की, या वेळी गोंधळ डबल आहे… आणि धमालही डबल होणार आहे. साध्या परिस्थितीतून मोठा गोंधळ निर्माण करणारी ‘साडे माडे तीन’ची ओळख या नव्या पोस्टरमधूनही ठळकपणे जाणवते आणि त्यामुळेच प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. या चित्रपटामध्ये घडणारी धमाल आणि गोंधळ पुन्हा अनुभवण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘साडे माडे तीन’चा पहिला भाग आजही प्रेक्षकांच्या आठवणीत ताजा आहे. भावंडांमधील जिव्हाळा, निरागस विनोद आणि पोट धरून हसवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या हृदयात कायमचा घर करून बसला आहे. विशेष म्हणजे, या अविस्मरणीय पहिल्या भागाचं दिग्दर्शनही अंकुश चौधरी यांनीच केले आहे. अभिनेता म्हणून लोकप्रिय असलेला अंकुश चौधरी दिग्दर्शक म्हणूनही तितकेच सक्षम आणि संवेदनशील असल्याचं त्यांनी अनेक चित्रपटांतून सिद्ध केले आहे. मनोरंजन आणि कथन यांचा अचूक समतोल साधणारी त्यांची दिग्दर्शकीय शैली ‘साडे माडे तीन’च्या यशामागचं मोठं कारण ठरली आहे. आता तब्बल एकोणीस वर्षांनंतर, त्याच आठवणींना उजाळा देत आणि आजच्या काळाशी जुळवून घेत ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अंकुश चौधरी यांच्यासारख्या अनुभवी दिग्दर्शकाच्या हातात ही कथा पुन्हा एकदा साकारली जात असल्यामुळे, या वेळी हास्याबरोबरच कथेतली पकडही तितकीच भक्कम असणार, यांचा अंदाज येत आहे. या चित्रपटाचे निर्मात्या उषा काकडे या चित्रपटाबद्दल म्हणले की, “हा चित्रपट म्हणजे केवळ पुढचा भाग नाही, तर प्रेक्षकांच्या आठवणींवरची प्रेमाची फुंकर आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जपून आणि मनापासून केली आहे.” तर, निर्माते अमेय खोपकर म्हणाले, ‘’पहिला चित्रपट पाहून मोठा झालेला प्रेक्षक आणि आजचा तरुण प्रेक्षक दोघांनाही एकत्र हसवणं, हीच आमची खरी परीक्षा होती आणि मला खात्री आहे, यात आम्ही यशस्वी झालो आहोत.’’

Previous Post

नववर्षापसून भीमाशंकर मंदिर होणार बंद? भाविकांना करावी लागणार ३ महीने प्रतिक्षा!

Next Post

उबर, ओला, रॅपिडोच्या अॅडव्हान्स टीपवर बंदी!

Next Post
उबर, ओला, रॅपिडोच्या अॅडव्हान्स टीपवर बंदी!

उबर, ओला, रॅपिडोच्या अॅडव्हान्स टीपवर बंदी!

BreakingNews

खासगी बसवर सरकारचा डिजिटल ‘वॉच’; आता फिटनेसपासून ड्रायव्हरपर्यंत सर्वकाही ट्रॅक होणार!

गरीब महिलांच्या नशिबी पुन्हा धुराचे लोट; सिलिंडर उपलब्ध नसल्याने चुलीचाच आधार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार

पॅन कार्ड प्रक्रियेत आता आधारसोबत मतदान कार्ड किंवा जन्म दाखला बंधनकारक – आयकर विभागाचा इशारा

ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांनी ओलांडला शंभरीचा टप्पा

राज्यातील प्रत्येक शाळेत मासिक पाळीच्या काळात विश्रांतीसाठी ‘पिंक रूम’! विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.