Lokrakshanay
Saturday, May 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

एमएमआरसीचे नागरिकांना आवाहन; ‘मेट्रो ३’ मार्गिकेच्या आसपास वृक्षारोपण करा

‘कुलाबा - वांद्रे - सिप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेलगतच्या परिसरात वृक्षारोपण करावे असे आवाहन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) नागरिकांना केले आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 18, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
एमएमआरसीचे नागरिकांना आवाहन; ‘मेट्रो ३’ मार्गिकेच्या आसपास वृक्षारोपण करा
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेलगतच्या परिसरात वृक्षारोपण करावे असे आवाहन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) नागरिकांना केले आहे. नागरिकांनी लावलेल्या झाडांची तीन वर्ष देखभाल करण्याची जबाबदारी ठेकेदारावर सोपविण्यात येणार आहे. मेट्रो ३ मार्गिकेच्या कामासाठी ३३.५ किमी परिसरातील झाडे मोठ्या संख्येने कापण्यात आली आहेत. तर आरे कारशेडमधील झाडांची कत्तल तर मोठा वादाचा विषय ठरला आहे. एकूणच मेट्रो ३ मार्गिकेत करण्यात आलेली झाडांची कत्तल लक्षात घेता याची नुकसानभरपाई म्हणून मेट्रो ३ च्या मार्गिकेच्या परिसरात मोठ्या संख्येने झाडे लावण्याचा निर्णय एमएमआरसीने घेतला आहे. वृक्षारोपणासंबंधीचे प्रतिज्ञापत्र एमएमआरसीने उच्च न्यायालयात सादर केले आहे. त्यानुसार मेट्रो स्थानक परिसरात वृक्षारोपण करण्यात येत आहे. तर आता एमएमआरसीने नागरिकांनाही वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले आहे. सरकारी, खासगी कार्यालये, निवासी संकुले, शैक्षणिक संस्था, रुग्णालये आदी आस्थापनांना एमएमआरसीने वृक्षारोपणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. वृक्षारोपणासाठीची झाडे आणि झाडांच्या लागवडीसाठी एमएमआरसीकडून मदत केली जाणार आहे. झाड लावल्यानंतर पुढील तीन वर्ष या झाडांच्या देखभालीची जबाबदारी एमएमआरसीच्या ठेकेदाराची असणार आहे. मेट्रो ३ मार्गिकेच्या आसपासच्या ५०० मीटरच्या परिसरात वृक्षारोपण करण्यास प्राधान्य असणार आहे. तेव्हा वृक्षारोपणासाठी इच्छुक नागरिक, गृहनिर्माण संस्था, इतर संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

http://mmrcl.com/en/documents/5635/public%20Notice%20 या संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांना अर्ज करता येणार आहे. १५ जुलैपर्यंत यासाठी एमएमआरसीकडून अर्ज स्वीकारले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्याशी संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी आणि वृक्षारोपण उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन एमएमआरसीने केले आहे.

Previous Post

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Next Post

खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर मंगळवार रात्रीपासून पालिकेची कारवाई मोहीम

Next Post
खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर मंगळवार रात्रीपासून पालिकेची कारवाई मोहीम

खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर मंगळवार रात्रीपासून पालिकेची कारवाई मोहीम

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.