वृत्तसंस्था : टेक कंपनी मेटा एक मोठं प्लॅनिंग करत आहे. कंपनी सध्या एका नव्या स्टँडअलोन अॅपवर काम करत आहे. हे अॅप शॉर्ट-टर्म कम्युनिकेशनच्या बाबतीत स्नॅपचॅटला टक्कर देणार असल्याचे सांगितलं जात आहे. कंपनी त्यांचं नवं अॅप Instants नावाने लाँच करू शकते. कारण एका रिपोर्टनुसार, कंपनीने कन्फर्म केलं आहे की, अॅपच्या नावाचे इंटरनल प्रोटोटाइप, डेव्हलप केले जात आहे. हे यूजर्सना डिसअपीयरिंग फोटो आणि व्हिडीओ सेंड आणि रिसिव्ह करण्याची परवानगी देणार आहे. असं देखील सांगितलं जात आहे की, मेटा त्यांच्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामसाठी देखील त्याच नावाचे आणि समान फंक्शनॅलिटीसह एक नवीन फीचर विकसित करत असल्याचे वृत्त आहे.
अशी आशा आहे की, हे इन-डेवलपमेंट स्टँडअलोन अॅप स्नॅपचॅटप्रमाणेच तयार केले जात आहे. मेटाच्या एक स्पोक्सपर्सनने बिजनेस इनसाइडरला कन्फर्म केले आहे की, नवीन स्टँडअलोन अॅप यूजर्सना डिसअपीयरिंग फोटो पाठवण्याची परवागनी देणार आहे आणि सध्या अंतर्गत प्रोटोटाइप म्हणून विकसित केले जात आहे. तथापि, त्याची एक्सटर्नल टेस्टिंग केली जात नाही. अॅप्स रिव्हर्स इंजिनिअर करणारे मोबाईल डेव्हलपर अलेस्सांद्रो पालुझी यांनी म्हटलं आहे की, मेटा त्यांचे नवीन अॅप Instants या नावाने लाँच करण्याची शक्यता आहे. इंस्टाग्रामवरील मेटा पेजवर देखील कंपनीच्या आगामी अॅपचा संदर्भ आढळला, जिथे मित्रांसह डिसअपीरिंग फोटो शेअर करण्याचा एक मार्ग म्हणून इन्स्टंटची यादी देण्यात आली होती. मेटाच्या प्रवक्त्याने पुष्टी केली आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instants नावाचे आणखी एका फीचरची चाचणी करत आहे. पूर्वी शॉट्स म्हणून ओळखले जाणारे फीचर जगभरातील अनेक देशांमध्ये लिमिटेड टेस्टद्वारे उपलब्ध उपलब्ध असल्याचे सांगितलं जात आहे रिपोर्ट्सनुसार, हे इन-डेवलपमेंट फीचर यूजर्सना त्यांच्या डायरेक्ट मेसेज (DMs) इनबॉक्समध्ये डिसअपीयरिंग मीडिया पाठवण्याची सुविधा ऑफर करतात. फोटो ओपन केल्यानंतर गायब होते आणि २४ तासांनंतर एक्सपायर होते. रिपोर्ट्सनुसार, इंस्टाग्रामचं असं म्हणणं आहे की, Instants फीचरचा वापर केवळ अशाच फॉलोवर्ससाठी केला जाऊ शकतो, ज्यांना तुम्ही फॉलो बॅक केलं आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकदा पाठवलेले Instants पुन्हा एडीट केले जाऊ शकत नाही.

