Lokrakshanay
Wednesday, April 8, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

९ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशभरात ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान

'आझादी का अमृत महोत्सव' 'मेरी माटी मेरा देश' या अभियानाने समारोप

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 28, 2023
in ताज्या बातम्या, देश -विदेश
९ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशभरात ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली  : ‘आझादी का अमृत महोत्सव’ ‘मेरी माटी मेरा देश’ चा समारोप या अभियानाने करण्यात येणार असून ग्रामीण भागात वसुधा वंदन, शिलाफलकम (स्मारक) यांसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव शैलेश कुमार सिंह आणि युवा कार्य विभागाच्या सचिव मीता राजीवलोचन यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली अलीकडेच बैठक झाली. या बैठकीत सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. युवा कार्य सचिव यांनी कार्यक्रमाच्या स्वरूपाबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे आयोजन ९ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत करण्यात येणार असून देशभरातील सुमारे ७,५०० ब्लॉकमधून निवडलेले तरुण दिल्लीच्या कर्तव्यपथावर या कार्यक्रमासाठी एकत्र येतील. ते त्यांच्या राज्यातील सर्व गावे/ग्रामपंचायतींमधून माती आणतील. ‘वसुधा वंदन’ कार्यक्रमाची दिल्लीतील कर्तव्य मार्गावर उभारण्यात येणाऱ्या अमृत वाटिकेत देशी वनस्पती आणि शिलाफलकम असणार आहेत.
ग्रामविकास सचिव शैलेश कुमार सिंह यांनी ‘वसुधा वंदन’ आणि ‘शिलाफलकम’चे महत्त्व सांगत, प्रत्येक ग्रामपंचायत/गाव वसुधा वंदन अंतर्गत देशी प्रजातींची ७५ रोपे लावून पृथ्वीमातेचे संवर्धन करतील. तसेच ‘वसुधा वंदन’ कार्यक्रम अमृत सरोवर किंवा कोणत्याही जलकुंभावर किंवा शाळा, ग्रामपंचायत इमारती किंवा ग्रामपंचायतीने ठरविल्यानुसार योग्य ठिकाणी / सार्वजनिक ठिकाणी आयोजित केला जाऊ शकेल.
देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व वीरांप्रति आपल्या मनातील भावना व्यक्त करणे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. ग्रामीण विकास सचिवांनी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना लोकसहभाग सुनिश्चित करण्याचे आवाहन केले असून सर्व स्तरातील लोकांना कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे.

Previous Post

महाराष्ट्रात ऑनलाईन गेम्स वर बंदी घाला, आमदार प्रतिभा धानोरकर यांची सरकारला मागणी

Next Post

अभिनेते शरद पोंक्षेंची लेक सिद्धी झाली पायलट !

Next Post
अभिनेते शरद पोंक्षेंची लेक सिद्धी झाली पायलट  !

अभिनेते शरद पोंक्षेंची लेक सिद्धी झाली पायलट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

BreakingNews

खासगी बसवर सरकारचा डिजिटल ‘वॉच’; आता फिटनेसपासून ड्रायव्हरपर्यंत सर्वकाही ट्रॅक होणार!

गरीब महिलांच्या नशिबी पुन्हा धुराचे लोट; सिलिंडर उपलब्ध नसल्याने चुलीचाच आधार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार

पॅन कार्ड प्रक्रियेत आता आधारसोबत मतदान कार्ड किंवा जन्म दाखला बंधनकारक – आयकर विभागाचा इशारा

ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांनी ओलांडला शंभरीचा टप्पा

राज्यातील प्रत्येक शाळेत मासिक पाळीच्या काळात विश्रांतीसाठी ‘पिंक रूम’! विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.